Tarun Bharat

सांगली : राजकीय सुडातून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले

Advertisements

आमदार सुधीर गाडगीळ; पश्चिम बंगाल मधील घटनांचा निषेध

प्रतिनिधी / सांगली

पश्चिम बंगालमध्ये राजकीय सूड भावनेतून तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यांचा खून केला जात आहे. या घटना निषेधार्य आहेत. केंद्र शासनाने वेळीच हस्तक्षेप करून या घटना थांबवाव्यात अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. या सर्व घटनांचा भाजप तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आमदार गाडगीळ बोलत होते.

आ. गाडगीळ म्हणाले, दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्याच दिवशी संध्याकाळपासून तेथे नरसंहार सुरु झाला. तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना शोधुन काढून त्यांच्यावर भ्याड हल्ले केले. अशा पद्धतीने हल्ले करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या पश्चिम बंगाल सरकारचा धिक्कार करतो. केंद्रशासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून हस्तक्षेप करून हे सर्व प्रकार थांबवावेत.

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाललागल्या नंतर त्या ठिकाणी सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. ठीकठिकानी भाजप पदाधिकारीव कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने तृणमूल कॉंग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत हि एक प्रकारे लोकशाहीची हत्या आहे. असे हि आ. गाडगीळ म्हणाले. यावेळी उपस्थित पदाधिकारी वकार्यकर्त्यांनी तृणमूल कॉंग्रेस सरकारचा निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. यावेळी नगरसेवक संजय कुलकर्णी, सचिव विश्वजित पाटील, गणपती साळुंखे, श्रीकांत वाघमोडे, सतीश खंडागळे आदी उपस्थित होते .

Related Stories

मिरजेत गोवा बनावटीची दारू जप्त, दोघांना अटक

Abhijeet Shinde

मिरज पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी दिलीप पाटील

Abhijeet Shinde

आटपाडीलगत विवाहितेचा गळा चिरला, दीड तासात आरोपी जेरबंद

Abhijeet Shinde

दोन मंत्री असतानाही सांगली जिल्ह्यातील नागरिकांची दयनीय अवस्था

Abhijeet Shinde

सांगली : लसीची प्रतीक्षा संपली; ६६ हजार डोस उपलब्ध

Abhijeet Shinde

सुर्यगाव येथील तरूण कृष्णेत बुडाला, शोधमोहीम सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!