Tarun Bharat

सांगली : राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची हत्या

आठवडय़ातील ही दुसरी घटना

 ऑनलाईन टीम / सांगली :

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांची अज्ञातांनी धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या केली. या आठवडय़ात राष्ट्रवादीच्या नेत्यांची हत्या होण्याची ही सांगलीतील दुसरी घटना आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवाशी होते. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे पाटील यांच्यावर अज्ञातांनी धारधार शस्त्राने हल्ला केला. दरम्यान, पाटील यांना तात्काळ मिरजेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरूवारी रात्री उशीरा उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला.

चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते आनंदराव पाटील यांचीही डोक्यात वार करून हत्या झाली होती. यामुळे सांगलीत पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

 

 

Related Stories

सांगली : कोरोनाची भिती नको दक्षता घ्या

Archana Banage

मुस्लीम लीग काँग्रेस असं नाव कराव : संबित पात्रा

prashant_c

10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!

prashant_c

सांगली : शासकीय तंत्रनिकेतनची प्रयोगशाळा फोडून दीड लाखांचे साहित्य लंपास

Archana Banage

शामरावनगर दफनभूमीची जागा मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकरीता तात्काळ हस्तांतरण करा

Abhijeet Khandekar

सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये वृक्ष रक्षाबंधन

Archana Banage