Tarun Bharat

सांगली : लक्षणे नसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार शक्य

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांची माहिती : रुग्णाला द्यावे लागणार प्रतिज्ञापत्र

प्रतिनिधी / विटा

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर विट्यात घरीच उपचार घेणे शक्य होणार आहे. मात्र त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. हृदयविकार, श्वसनाचे विकार, मधुमेह, रक्तदाब यासह अन्य गंभीर आजार नसलेल्या साठ वर्षाखालील रुग्णांवर घरीच उपचार शक्य आहेत. फिरत्या पथकामार्फत अशा रुग्णाला वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाची लक्षणे आणि इतर गंभीर आजार नसलेल्या कोरोनाग्रस्त व्यक्तींना आता कोरोना केअर सेंटर अथवा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याऐवजी आता त्यांना थेट घरातच उपचार घेण्याची योजना जिल्हा प्रशासनाने तयार केली आहे. याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात सुमारे पंधराशेहून अधिक रुग्ण झाले आहेत. उपचाराखालील रुग्णसंख्या साडेसातशे झाली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना रूग्णालय, कोरोना केअर सेंटर, संस्थात्मक विलगीकरण यावर मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागला आहे. अशा परिस्थितीत लक्षणे नसलेल्या मात्र पॉझिटीव्ह असलेल्या व्यक्तींसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या रुग्णाना हृदयविकार, श्वसनाचे विकार, मधुमेह, रक्तदाब व अन्य स्वरूपाचे गंभीर आजारी नसावेत, असे निर्देशित करण्यात आले आहे.

उपचार करणाऱ्या संबंधित आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रुग्णास अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबदद्ल वैद्यकिय दृष्टया प्रमाणित केलेले असावे. संबंधीत रुग्णांच्या घरी त्यांच्या गृह विलगीकरणासाठी तसेच कुटुंबातील निकट सहवासातील व्यक्ती करीता अलगीकरणासाठी योग्य सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात. घरामध्ये हवेशीर किमान स्वतंत्र दोन खोल्या असाव्यात. प्रत्येक खोलीमध्ये स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. याबाबतची खात्री संबंधीत वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्वतः करावी अथवा समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत करुन घ्यावी. तसेच रुग्णाची काळजी घेण्यासाठी एक 50 वर्षच्या आतील गंभीर आजार नसणारी व्यक्ती असावी. अशा व्यक्तीने आरोग्य अधिकाऱ्यांनी रुग्णाची काळजी घेण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

फिरते वैद्यकीय पथक : डॉ. लोखंडे
या गृह विलगिकरणात राहणाऱ्या रुग्णांना सर्व अटी व नियम शर्ती मान्य करावे लागतील. गृह विलगिकरणात मध्ये स्वतःच्या जबाबदारीवर राहिन. घराबाहेर पडणार नाही, घराबाहेर पडल्यास कारवाईस पात्र राहीन, असे प्रतिज्ञापत्र शासनाला द्यावे लागणार आहे. घरात राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांवर शासनाच्या फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत नियमित उपचार केले जाणार आहेत. या पथकाचे संपर्क क्रमांक संबंधित रुग्ण आणि नातेवाईकांना देण्यात येतील, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल लोखंडे यांनी दिली आहे.

Related Stories

राज्य सरकारची प्रत्यक्ष मदत दीड हजार कोटींचीच– देवेंद्र फडणवीस

Archana Banage

भास्कर जाधवांना चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांची नोटीस

Archana Banage

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रूग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

Tousif Mujawar

सांगली : नवकृष्णा व्हॅली शाळेसमोर तब्बल १० मोठ्या झाडांची कत्तल

Archana Banage

जिह्यात कोव्हॅक्सीन लसीचा तुटवडा

Patil_p

सांगली : वाकुर्डे खुर्द येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Archana Banage