Tarun Bharat

सांगली : वडगावचे जवान दशरथ पाटील जम्मूत शहीद

गावात शोककळा : कर्तव्यावर असताना घडली दुर्देवी घटना

सावळज / वार्ताहर

वडगाव ता. तासगाव येथील भारतीय सैन्य दलातील जवान दशरथ पोपट पाटील (वय 39) हे जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. ही घटना सोमवारी दि.७ रोजी सकाळी घडली. ही दुर्दैवी घटना समजल्यानंतर वडगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव बुधवारी पहाटे वडगाव येथे येणार असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली.

शहीद दशरथ पाटील हे सन २००० साली भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. सुमारे २० वर्षे त्यांनी सैन्यदलात सेवा बजावली आहे. राजस्थानमधील कोटा येथे सेवा बजावत होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांची बदली झाली होती. बदली झाल्यामुळे सोबत असलेल्या आपल्या पत्नी व मुलांना गावाकडे सोडून जम्मु येथे देशसेवा करण्यासाठी गेले होते. मात्र सोमवारी सकाळी जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले.

सोमवारी दुपारी पाटील यांचे बंधू तुकाराम पाटील यांना फोनवरून या दुर्दैवी घटनेची माहिती सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ही घटना समजल्यानंतर वडगावसह परिसरात शोककळा पसरली आहे. दशरथ पाटील हे गावातील पाचवे शहिद जवान आहेत. बुधवारी दि. ९ रोजी पहाटेपर्यंत त्यांचे पार्थिव वडगाव येथे येणार आहे.

शहीद जवान पाटील हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते उत्कृष्ट खेळाडू होते. तसेच पुणे- मुंबई मॅरेथॉन स्पर्धामध्ये विक्रमी यश संपादन केले असल्याची माहिती कुटुंबाने दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, नऊ वर्षाची मुलगी, दीड वर्षाचा मुलगा, आई, वडिल, भाऊ, भावजया असा परीवार आहे. त्यांचे बंधू तुकाराम पाटील यांनी ही भारतीय सैन्यदलात सेवा बजावली आहे. ते २०१४ ला सेवानिवृत्त झाले आहेत.

Related Stories

सांगली : सागरेश्वर अभयारण्यात बिबट्याचे दर्शन

Archana Banage

मनपा समाजकल्याण समितीत वादंग

Archana Banage

मणेराजुरीतील खंडोबा ओढ्यावरील अरुंद पुलावरून दारूची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Archana Banage

सांगली : म्हैसाळ योजनेचे पाणी आरगच्या पाझर तलावात सोडण्याचे आदेश

Archana Banage

मान्सूनपूर्वची 12 तासांहून अधिक बरसात, जनजीवन विस्कळीत

Archana Banage

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरदारांना ये जा करण्यासाठी परवानगी द्यावी

Archana Banage