Tarun Bharat

सांगली : वारणालीतील नियोजित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेची जयंत पाटील यांनी केली पाहणी

Advertisements

कुपवाड / प्रतिनिधी

कुपवाडच्या प्रभाग क्रमांक आठमधील विद्यानगर वारणाली येथील नियोजित मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या जागेची रविवारी राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल पूर्णत्वासाठी लवकरच भूमीपूजन घेऊन कामास सुरुवात करणार असल्याचे ना.जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, राहुल पवार, शेखर माने, शेडजी मोहिते, संतोष पाटील, सुनील भोसले यांसह मनपातील प्रशासकीय अधिकारी व प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कोरोना महामारी सारख्या भयानक परिस्थितीत हॉस्पिटल लवकरात लवकर पूर्ण होईल याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Related Stories

इस्लामपूर : चौगुले हॉस्पिटलला एनएबीएच नामांकन

Sumit Tambekar

इस्लामपूर पोलीसांचा मिरवणुकीत झिंगाट डान्स

Abhijeet Shinde

सांगलीतील अपहरण झालेले बाळ सापडले, रुग्णालयातील नर्सनेच केले कृत्य

Abhijeet Khandekar

सांगली जिल्हा परिषदमध्ये ६० जागांसाठी निवडणूक

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात बुधवारी लसीकरण नाही

Abhijeet Shinde

पहिल्याच सभेत मिरजेवर ६४ लाखांची कृपा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!