Tarun Bharat

सांगली : वारणा धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा

Advertisements

वारणा 7980 व कोयना धरणातून 33266 क्सुसेक्स विसर्ग सुरू

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज दि. 28 जूलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 31.38 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

विविध धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 90.90 (105.25), धोम 10.73 (13.50), कन्हेर 8.02 (10.10), दूधगंगा 21.39 (25.40), राधानगरी 8.25 (8.36), तुळशी 3.30 (3.47), कासारी 2.23 (2.77), पाटगांव 3.38 (3.72), धोम बलकवडी 3.40 (4.08), उरमोडी 7.50 (9.97), तारळी 5.01 (5.85), अलमट्टी 81.78 (123).

आज सकाळी 8 वाजेपर्यंत विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 33266, धोम 2176, कण्हेर 2376, वारणा 7980, दुधगंगा 2050 राधानगरी 2828, तुळशी 1016,कासारी 250, धोम बलकवडी 537, उरमोडी 1234 तारळी 2264 व अलमट्टी 3 लाख 40 हजार 803 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 19.05 (45), आयर्विन पूल सांगली 44.10 (40) व अंकली पूल हरिपूर 51.6 (45.11)

Related Stories

राष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांचा राजीनामा

Archana Banage

पावसाच्या हाहाकारानंतर एका रात्रीत उभा राहिली यात्रा

Archana Banage

सांगली : कोरोना निधीसाठी केलेल्या शिवरायांच्या पेंटिंगची पन्नास हजारास विक्री

Archana Banage

बिबट्या मादी व बछड्याची भेट कॅमेऱ्यात कैद

Abhijeet Khandekar

नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार

Abhijeet Khandekar

अश्विनकुमार उर्फ बाळासाहेब लकडे यांचे निधन

Archana Banage
error: Content is protected !!