वाळवा / वार्ताहर
आज वाळवा येथे पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पण मुळगाव वाळवा असलेला पोलीस कर्मचारी ६ ऑगस्टला कोरोना पॉझीटीव्ह आला होता. त्या तरुणाची २९ वर्षीय पत्नी आणि ६४ वर्षीय आईसुद्धा आज कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे गावकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.
त्या तरुणाचे वडीलही घरी असतात त्यांचाही स्वॅब डॅाक्टरांनी घेतला आहे. त्याची प्रतिक्षा आहे. त्या तरुणाला इस्लामपूर येथे संस्थात्मक अलगीकरण यापुर्वीच करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव नायकवडी, सरपंच डॉ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहीर, ग्रामपंचायत सदस्य वर्धमान मगदुम, मिलिंद थोरात परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. या नवीन कोरोना पॉझिटिव्ह दोन महीलांसह वाळवा गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. गावकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.


previous post
next post