Tarun Bharat

सांगली : ‘विट्याचा राजा’ कोविड रुग्णांसाठी दोन अत्याधुनिक ऑक्सिजन मशीन देणार

नगरसेवक अमोल बाबर यांची माहिती : गणेशोत्सव मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी / विटा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विट्यातील कोविड सेंटरला हाय फ्लो ऑक्सिजन ह्युमीडिफायर मशीन देण्याचा संकल्प केला आहे. एक आठवड्यात सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे दोन ऑक्सिजन मशीन देणार आहोत. विटा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक रुग्णालय यांना हे मशीन देण्यात येणार आहे, अशी माहिती विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक अमोल बाबर यांनी दिली.

याबाबत नगरसेवक बाबर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

नगरसेवक बाबर म्हणाले, दरवर्षी विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करतो. भाविकांच्या दर्शनासाठी लालबागच्या राजाची मूर्ती दरवर्षी मुबंई येथून आणत असतो. यावर्षी कोरोनाचे संकट गंभीर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आहेत. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करीत आहे. यावर्षी लहान मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. भाविकांसाठी विट्याच्या राजाच्या ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे.

यावर्षी मोठ्या खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक समस्या जाणवत आहेत. विट्याच्या कोविड सेंटरला दोन हाय फ्लो ऑक्सिजन ह्युमीडिफायर मशीन देण्याचा संकल्प केला आहे. एक आठवड्यात ऑक्सिजन मशीन देणार आहोत. विटा ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक रुग्णालय यांना हे मशीन देण्यात येणार आहे. रुग्णांना याचा फायदा होणार आहे. जवळपास पाच लाख रुपये खर्चाचे हे अत्याधुनिक दोन मशीन आहेत. त्याचा फायदा लोकांना होईल. यापुढील काळात ही विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आम्ही मदत करणार आहे, असेही नगरसेवक बाबर म्हणाले.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित पवार, सौरभ रोकडे परिषदेस उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी कायम

विट्याचा राजा सार्वजनिक मंडळाने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. दुष्काळ, महापूर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आदी उपक्रमात मंडळ वर्षभर कार्यरत असते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरा करीत आहे. त्यातून शिल्लक निधी सामाजिक कार्यात वळवला असल्याचे नगरसेवक अमोल बाबर यांनी सांगितले.

Related Stories

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यात 30.4 मि. मी. पाऊस

Archana Banage

निवडणूक प्रक्रिया प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणूक यंत्रणेला सहकार्य करा

Archana Banage

मिरज : सुभाषनगरमध्ये मुलाकडून वडीलांना गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न

Archana Banage

उद्या सुपर फ्लावर मून छायाकल्प, ग्रहणात होणार महा चंद्रोदय – डॉ. शंकर शेलार

Archana Banage

लाच प्रकरणी तलाठी गुरव याच्यावर कारवाई

Archana Banage

सांगली : वाढत्या रूग्णसंख्येला प्रशासन जबाबदार

Archana Banage