Tarun Bharat

सांगली : विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतदान

■यंत्रणा सज्य,उत्सुकता शिगेला
■ भारती,रयत,स्वामी शिक्षणसंस्थाकडे लक्ष
■उमेदवार संख्या प्रचंड,कोण किती मते खातो यावर निकालाची गणीते

सांगली / प्रतिनिधी :

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवारी सकाळी 8 ते 5 मतदान होत आहे. सांगली, कोल्हापूर,सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील नोंदणी केलेले मतदार पसंतीक्रमानूसार मतदान करणार आहेत. पुणे पदवीधर हा भाजपाचा पारंपरिक मतदार संघ आहे तेथे पक्षाने संग्रामसिंह देशमुख यांना उभे करुन मराठा कार्ड खेळले आहे तर अनूभवी खिलाडी अरुण लाड यांना मैदानात उतरवून राष्ट्रवादी महाआघाडीने प्रचाराची रणधुमाळी उडवली आहे.रुपाली पाटील, शरद पाटील,श्रीमंत कोकाटे,अमोल पवार,बाळकृष्ण यमगर असे अनेक जण नशीब आजमावत प्रचारात उतरले आहेत. पंसतीक्रमानुसार मतदान असल्याने कमी मते कुणाला पडणार व त्याची दोन नंबरची मते कुणाला मिळणार याला महत्त्व आले आहे.विजयाचे दावे प्रत्येक उमेदवार करतो आहे. शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत याचेसह महाआघाडीचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत महायुतीचे जितेंद्र पवार यांच्यात चूरस दिसते आहे. रयत,स्वामी, भारती अशा मोठ्या शिक्षण संस्थेचे शिक्षक व पदवीधर काय करतात यालाही महत्व आहे. भारती विद्यापीठाचे प्रमुख विश्वजीत कदम यांचा काँग्रेस आघाडी उमेदवारांच्या प्रचारात सहभाग होता पण पुणे,सांगली, सातारा, सोलापूर सह पाच जिल्ह्यात भारती विद्यापीठ विस्तार व प्रभाव आहे.

Related Stories

Sangli; राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलं पदक मराठमोळ्या तरुणाचं, सांगलीच्या संकेत सरगरने पटकवलं रौप्य

Abhijeet Khandekar

कोविड केंद्रात महिला सुरक्षेसाठी काटेकोर नियम पालन करा – जिल्हाधिकारी

Archana Banage

सांगली : राज्यमार्गावरील धुळीमुळे द्राक्षबागांची ‘धूळदाण’

Archana Banage

कामगार आणि शेतकऱ्यांनी एकमेकांना आधार देण्याची गरज : राजू शेट्टी

Archana Banage

मिरज रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणे जमीनदोस्त; घरे व झोपड्या हटविल्या

Abhijeet Khandekar

कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी: अनिल घनवट

Archana Banage