Tarun Bharat

सांगली : वृत्तपत्र विक्रीच्या स्टॉलना संरक्षण द्या

आ. संजय केळकर यांचे नगरविकास मंत्र्यांना निवेदन
ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत आदेश देण्याची मागणी

प्रतिनिधी / सांगली

विधानसभेच्या सभागृहात सांगितल्याप्रमाणे राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील वृत्तपत्र विक्रीच्या स्टाॅलना संरक्षण द्यावे अशी मागणी राज्य वृत्तपत्र विक्रेत्यांचे मार्गदर्शक, आमदार संजय केळकर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबतचे लेखी पत्र नुकतेच देण्यात आले.

पत्रात म्हटले आहे की, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलना संरक्षण देण्याबाबत सभागृहात सांगितले गेले होते. वृत्तपत्र विक्रेता हा फेरीवाला नसून तो लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा घटक आहे. तथापि वृत्तपत्र विक्रेते ठिकठिकाणी आपल्या स्वयंरोजगाराद्वारे कुटुंबनिर्वाह करतात. मात्र, त्यांच्यावर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायतसह  स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फेरीवाला म्हणून कारवाई होते.

राज्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाई सुरू आहेत. कारवाई सुरू असल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. यासाठी परिपत्रक काढून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या स्टॉलना या कारवाईतून वगळण्याबाबत व त्यांना संरक्षण मिळणेबाबत राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतसह स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना कराव्यात व तशा प्रकारचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी आमदार केळकर यांनी केली आहे.

Related Stories

संभाजीराजे यांनी मानले फडणवीस यांचे आभार; मुंबईत घेतली भेट

Abhijeet Khandekar

कोरोनावर मात व अर्थव्यवस्था रुळावर आणणं हीच दोन मोठी आव्हानं; उपमुख्यमंत्री अजित पवार

Archana Banage

सांगली : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून दोन गाड्या फोडल्या

Archana Banage

सांगली : विट्यात नगरसेवकांचे कर्मचाऱ्यांसह महावितरण कार्यालयात धरणे

Archana Banage

Sangli; अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून प्रकरणी जन्मठेप

Abhijeet Khandekar

कर्नाटकात सातत्याने मराठी अस्मितेची गळचेपी – वैभव पाटील

Abhijeet Khandekar