Tarun Bharat

सांगली वृत्तपत्र विपेता संघटनेची तरुण भारतला सदिच्छा भेट

बेळगाव / प्रतिनिधी

सांगली जिल्हा वृत्तपत्र विपेता एजंट असोसिएशनने बुधवारी बेळगावच्या तरुण भारत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तरुण भारतचे सीईओ दीपक प्रभू व वितरण व्यवस्थापक शिवानंद सलगर यांनी सर्वांचे स्वागत केले. सांगली येथे यावषी 26 व 27 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विपेता संघटनेचे अधिवेशन होणार असल्याने त्या अधिवेशनाला तरुण भारततर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

सांगली येथे होणाऱया या अधिवेशनामध्ये वृत्तपत्र व्यावसायिकांना भेडसावणाऱया अडचणी व त्यांच्या आरोग्याच्या समस्येवर चर्चा केली जाणार आहे. यावेळी देशातील 15 राज्यांमधील वृत्तपत्र संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये बेळगाव जिल्हा व कर्नाटकातील वृत्तपत्र विपेतेही मोठय़ा संख्येने सहभागी होतील, असा विश्वास बेळगावमधील वृत्तपत्र विपेत्यांनी या पदाधिकाऱयांना दिला.

यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विपेता संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य संघटनेचे संचालक मारुती नवलाई, सांगली जिल्हा वृत्तपत्र विपेता एजंट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा संघटक सचिन चोपडे, जिल्हा सरचिटणीस विशाल रासनकर, आर. एस. माने, सचिन माळी, नागेश कोरे, श्रीपाद पाटील उपस्थित होते. 

Related Stories

बेंगळूर: मेट्रोच्या ८० हून अधिक कामगारांना कोरोना

Archana Banage

मुतगा येथे अंगणवाडी बांधकामाला चालना

Amit Kulkarni

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचे सादरीकरण

tarunbharat

एटीएममधून पैसे काढताना खबरदारीची गरज

Patil_p

खानापूर रामनगर रस्त्यावर पुन्हा एकदा पाच तास वाहतुकीची कोंडी

Patil_p

‘हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा’मधून रसिक खळखळून हसले

Amit Kulkarni
error: Content is protected !!