Tarun Bharat

सांगली : शंभर फुटी रोडवर मंडप गोडावूनला आग

शंभर फुटी रोडवर दुर्घटना : लाखो रुपयांचे साहित्य जळाले

प्रतिनिधी / सांगली

 शंभरफुटी रस्त्यावरील मंडपासह सजावटीच्या साहित्याच्या गोदामास सोमवारी  दुपारी आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमध्ये लाखो रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले असून मंडप साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पाच वाहनांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांतर ही आग आटोक्यात आणली.

कासीम शेख मंडप ऍण्ड डेकोरेटर्स यांच्या या गोदामामध्ये मोठ्याप्रमाणात मंडप तसेच सजावटीचे अत्याधुनिक साहित्य होते. आग अचानक कशी लागली हे समजण्याच्या आधीच येथील मंडप साहित्य आणि सजावटीचे साहित्य जळून खाक झाले. दुपारी एकच्या सुमारास गोदामातून धूर येऊ लागल्याचे परिसरातील लोकांनी पाहिले. तत्काळ अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनच्या पाच गाडÎा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

Related Stories

विट्यात बिबट्याच्या वायरल व्हिडिओमुळे खळबळ; अफवांवर विश्वास ठेवू नका – वनक्षेत्रपाल कांबळे

Archana Banage

कुस्ती, कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल स्पर्धांच्या 1 कोटी निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Khandekar

सांगली : आघाडी धर्माची बिघाडी काँग्रेसकडूनच झाली

Archana Banage

सांगली : `तरूण भारत’ हे जनतेचे मुखपत्र

Archana Banage

माधवनगरच्या उपसरपंचपदी देवराज बागल यांची बिनविरोध निवड

Archana Banage

हॉटेल वरील निर्बंध शिथिल करा

Archana Banage