Tarun Bharat

सांगली शहरात नवे ४४ रुग्ण

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरात बुधवारी कोरोनाने हाहाकार माजविला आहे. बुधवारी दुपारपर्यंत तब्बल 44 रुग्ण सांगली शहरात आढळून आले. यामध्ये महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या सावली बेघर केंद्रात 37 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चार दिवसापूर्वी या ठिकाणी एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याने या सर्वांना अलगी करण केलं होतं. आज त्यांचे अहवाल आले असता हे सर्व पॉझिटिव निघाले. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात दाखल केले आहे.

शहरातील कुदळे प्लॉट येथे तीन रुग्ण सापडले आहेत तर सांगलवाडीतील मध्यवर्ती वस्तीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मोहिते गल्लीतील एकास कोरोनाची लागण झाली आहे. मिरजेत तीन नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये भारती हॉस्पिटल मधील हॉस्टेल मध्ये राहणारा एक विद्यार्थी पॉझिटिव आला आहे. तर कमान वेस आणि मंगळवार पेठ याठिकाणी ही रुग्ण आढळून आले आहेत . सांगली महापालिका क्षेत्रात विक्रमी 44 रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 748 वर जाऊन पोहोचली आहे.

Related Stories

रेड झोनच्या सीमेवर कोल्हापूर

Archana Banage

मांढरदेव घाटात दरड कोसळली, दरड हटवून वाहतूक केली सुरळीत

Archana Banage

पाटोळ खडकीत 6 पॉजिटिव रुग्ण सापडल्याने खडकीची संख्या 8

Patil_p

नेत्यांच्या अलिशान गाडय़ांना खड्डे जाणवेनात

Patil_p

राणेंच्या बंगल्यावरील कारवाईची नोटीस मागे

datta jadhav

सांगली जिल्ह्याचा लॉकडाऊन…आणखी सात दिवस

Archana Banage