Tarun Bharat

सांगली शहरात लव्हली सर्कल जवळ तरुणाचा खून

प्रतिनिधी / सांगली

सांगली शहरातील संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लव्हली सर्कल ते मंगळवार बाजारच्या आतील रस्त्यावर फिरोज शेरअली शेख वय ४० सध्या रा. शिंदेमळा, सांगली. मुळ गाव मिरज याचा त्याच्या ओळखीच्या दोघा तिघांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करून खून केला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, फिरोज शेरअली शेख हा शिंदेमळा येथे त्याच्या सासुरवाडीत राहतो. त्याचे मुळगाव मिरज आहे. त्याला दारूचे व्यसन होते. मंगळवारी रात्रीही तो दारूच्या नशेत होता. त्याचवेळी त्याच्या ओळखीच्या लोकांनीच त्याच्याशी वाद झाल्यावर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.

बुधवारी पहाटे जखमी अवस्थेत त्याला वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल केले असता तो मयत आढळून आला. त्यामुळे संजयनगर पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याच्याबरोबर असणाऱ्यांचा शोध सुरु केला आहे. अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय श्रीरसागर यांनी दिली

Related Stories

तोळणूर येथे जुगार अड्ड्यावर छापा, ९७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Archana Banage

नेर्लेच्या ‘त्या’ महिलेचा खून अनैतिक संबंध, पैशांच्या कारणावरून

Archana Banage

तलावात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू,बेडग येथील दुर्देवी घटना

Archana Banage

कर्मवीर भाऊराव पाटील यांना सांगलीत अभिवादन

Archana Banage

सावर्डेत पारधी व वनविभागांच्या कर्मचाऱ्यात राडा, महिला जखमी

Archana Banage

इलेक्ट्रिक दुचाकीची डीलरशिप देतो म्हणत 18 लाखांची फसवणूक

Archana Banage
error: Content is protected !!