Tarun Bharat

सांगली : शांतिनिकेतनमध्ये 1971 युध्दातील रणगाडा दाखल

सांगलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सांगली / प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या 1971 च्या युद्धातला प्रत्यक्ष साक्षीदार व्ही एक्स -1323 रणगाडा सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापिठ संस्थेत दाखल झाला असून त्यामुळे सांगलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

भारतीय सैन्य दलातील यशस्वी रणगाडा सांगलीत आणण्याची माजी आमदार प्राचार्य दिवंगत पी. बी. पाटील यांची इच्छा त्यांचे पुत्र गौतम पाटील यांनी पूर्ण केली आहे. त्यांना साथ लाभली ती प्राचार्य पाटील यांचे पुतणे ब्रिगेडीयर सुरेश पाटील यांची. त्यांच्या गेल्या काही वर्षापासूनच्या अथक परिश्रमाला अखेर यश आले. खूप अडचणी आल्या पण शांतिनिकेतन संस्थेने चिकाटी सोडली नाही आणि अखेर
शांतिनिकेतन परिवारामध्ये एक नवीन सदस्य दाखल झाला.

प्राचार्य पी. बी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोज ( माई) पाटील यांनी अथक प्रयत्नांतून सामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची शिक्षण संस्था सांगलीत नावारूपाला आणली. सामान्य कुटुंबातील शेकडो विद्यार्थी इथे या योजनेतून शिकून समाजाला प्रेरक कार्य करू शकले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री महादेव जानकर असे राजकारणीही या संस्थेत घडले. भारतीय सैन्यापासून कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधी आदी क्षेत्रात चमकणारे हजारो विद्यार्थी घडले.

लष्करी शिक्षण देणारी ले. जन. एस. पी. पी. थोरात आकदमी सुध्दा संस्थेने उभी केली असून त्याद्वारे उत्तम व्यक्तिमत्व आणि लष्करी स्वरूपाचे प्रशिक्षण संस्थेत दिले जाते. या ठिकाणी रणगाडा हवाच असा प्राचार्य पी. बी. पाटील यांचा आग्रह होता. मात्र यासाठी प्रयत्न सुरू असतानाच कर्करोगाने त्यांचे निधन झाले. मात्र ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द गौतम पाटील यांनी बाळगली आणि अखेर मंगळवारी दुपारी संस्थेने सर्व प्रक्रिया पूर्ण करून हा रणगाडा संस्थेत आणला. यावेळी उपस्थितांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले. देशभक्तीपर घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला.

Related Stories

देवदूत बनून रुग्णांना आधार दिल्याबद्दल मानव समाज सदैव आपला ऋणी राहील

Archana Banage

महिला उपजिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

Archana Banage

Sangli; नकली सोने गहाण ठेवून जिल्हा बँकेची फसवणूक

Kalyani Amanagi

”या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला चांगलेच माहितीये”

Archana Banage

राष्ट्रीय स्पर्धेत सुदेष्णा कांस्य पदकांची मानकरी

Patil_p

सातारच्या मुख्याधिकारीपदी रंजना गगे

Patil_p