Tarun Bharat

सांगली : शिरगाव पुलासाठी 33 कोटीचा निधी मंजूर

प्रतिनिधी / आष्टा

गेल्या अनेक वर्षांपासून वाळवा-इस्लामपूर मतदारसंघातील शिरगाव येथे कृष्णा नदीवर मोठा पूल बांधण्याची मागणी होती. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत या मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ३३.८७ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. ही अत्यंत समाधानकारक वार्ता आहे. असे पालकमंत्री यांनी म्हटले आहे.

शिरगाव इस्लामपूर वाळवा मतदारसंघातील एकमेव गाव कृष्णा नदीच्या पलीकडे असल्याने पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती. पूरपरिस्थितीत शिरगाववासीयांना येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येतील. हा पूल अस्तित्वात आल्यानंतर शिरगाव येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत आष्टा-दुधगाव-कुंभोज पुलापर्यंत रस्ता रुंदीकरणाच्या कामालाही ३.९६ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे आष्टा-दुधगाव परिसराचे थेट कोल्हापूर जिल्ह्याशी दळणवळण सुलभ होणार आहे.

Related Stories

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गर्व्हनिंग कौन्सिलपदी रमेश आरवाडे यांची निवड

Abhijeet Khandekar

पुण्यात 12 तासात 55 नवे कोरोना रुग्ण

prashant_c

सांगे तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या १३१ वर

GAURESH SATTARKAR

Ratnagiri : संगमेश्वरमध्ये साडेसात लाखाच्या दागिन्यांची चोरी…दागिने घरातूनच हस्तगत

Abhijeet Khandekar

सांगली : आटपाडी नगरपालिकेसाठी पालकमंत्र्यांची ग्वाही: भारत पाटील यांनी घातले साकडे

Archana Banage

सातारा : आमदार शशिकांत शिंदेंनी नागरी समस्यांचा केला निपटारा

Archana Banage