Tarun Bharat

सांगली : शिवरायांचा लोककल्याणकारी स्वराज्याचा आदर्श घेवून जिल्हा परिषदेने कार्य करावे : पालकमंत्री

Advertisements

प्रतिनिधी / सांगली :

छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याच्या पुढे आणलेल्या संकल्पनेतून आदर्श घेवून सांगली जिल्हा परिषद कार्य करेल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांगली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवस्वराज्य गुढीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहूल गावडे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदिंची उपस्थिती होती.

६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस म्हणून याला विशेष महत्व आहे. सांगली जिल्हा परिषदेने पुढाकार घेवून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर व त्यांनी ज्या पध्दतीने राज्यकारभार केला त्याचा आदर्श घेवून त्यातून प्रेरणा घ्यावी यासाठी शिवस्वराज्य गुढी उभारली आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी होम आयसोलेशनमधील कोविड रूग्णांकरिता असणारे कॉल सेंटर, बेड मॅनेजमेंट कॉल सेंटर यांना भेट देवून तेथील कामकाजाची पाहणी केली. या कार्यक्रमाप्रसंगी शाहीर माधवी माळी व त्यांच्या साथीदारांनी महाराष्ट्र गीत गाईले.

Related Stories

सांगली : भाजप सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा – आ. सुधीर गाडगीळ

Abhijeet Shinde

सावळीत फूड कारखान्याला आग, ७० लाखांचे नुकसान

Abhijeet Shinde

सांगली : तासगाव रोडवरील अपघातात महिलेचा मृत्यू

Abhijeet Shinde

मुलभूत सुविधा नाहीत, ही कसली आजादी.!

Abhijeet Shinde

फसव्या व्यापाऱ्यांपासून सावध रहा; व्यापाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करा

Abhijeet Shinde

सांगली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या विरोधात सदस्यांचे आंदोलन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!