Tarun Bharat

सांगली : संजनाची जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी / सांगली

कवलापूर येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्राची राष्ट्रीय पदक विजेती पैलवान कुमारी संजना खंडू बागडी तुंग हिची रशिया येथे दिनांक १६ ते २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी इंदिरा गांधी स्टेडियम स्टेडियम दिल्ली येथे दिनांक ५ जुलै रोजी भारतीय कुस्ती महासंघाने संघ निवड चाचणी आयोजित केली आहे. त्यासाठी २०२१ मधील पदक विजेत्या मल्लांना निमंत्रित केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून फक्त चार मुलींची निवड झाली आहे.

संजना ही आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रात आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील, राष्ट्रीय कुस्ती पंच दीपक पाटील, एन आय एस कुस्ती कोच सुहास पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. या निवड चाचणीतून रशिया येथे होणाऱ्या जागतिक कुमारी कुस्ती स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष, सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष, नामदेवराव मोहिते व कुस्ती केंद्रातील पदाधिकारी व विश्वस्त, यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Stories

मुख्यमंत्री पदावर येताच एकनाथ शिंदेंच्या ‘या’ घोषणा

Abhijeet Khandekar

भारताचा एकतर्फी मालिकाविजय

Patil_p

भारत-न्यूझीलंड पहिली वनडे आज

Patil_p

जिह्यातील सहा नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

Patil_p

फुटबॉलपटू रॉस्सीला शेवटचा निरोप

Patil_p

“असली आ रहा है, नकली से सावधान” अयोध्येत पोस्टरबाजी करत शिवसेनेने राज ठाकरेंना डिवचलं

datta jadhav