Tarun Bharat

सांगली : सामाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमुळे शासनाला हातभार : पालकमंत्री

Advertisements

प्रतिनिधी / सांगली

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट सुदैवाने आता १० ते ११ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. येत्या पाच-सहा दिवसांमध्ये हा रेट ६ ते ७ टक्क्यापर्यंत येईल. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचा कोविड रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल. अशा समाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमुळे शासनाला चांगलाच हातभार लागत आहे. त्यामुळे शासनावरचा काहीसा भार हलका होत असल्याचे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटन

वसंतदादा डेटल कॉलेज बुधगाव कवलापूर येथे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचलित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, महापौर दिग्विजय सुर्यंवशी, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, संजय बजाज, जितेश कदम, सुरेश पाटील स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचे संयोजयक तुकाराम मासाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या पुढाकाराने डेंटल कॉलेजच्या इमारती मध्ये सुरु करण्यात आलेल्या या कोविड सेंटरची व्यवस्था अतिशय चांगली झाली असून जवळपास १०० बेडच्या या हॉस्पिटलमध्ये 20 ऑक्सिजन बेड, 20 लहान मुलांसाठी बेड, 50 रेग्युलर बेड व 5 व्हेटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ज्या पदध्दतीने व्यवस्था असतात अशा पध्दतीच्या खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यामुळे एक चांगली व्यवस्था सांगलीकरांना व खास करुन मिरज तालुक्यातील ग्रामीण भागाला उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी सुरु करण्यात आलेल्या एका चांगल्या जनसेवेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या दिड दोन वर्षापासून जगात, भारत व महाराष्ट्रामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समाजामध्ये प्रचंड मोठी हानी झाली, व्यवसाय ठप्प झाले. या पार्श्वभूमी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना करण्यात येत आहेत.

Related Stories

सांगली : मिरजेत डॉक्टराचा बंगला कामगारानेच फोडला

Abhijeet Shinde

लकी ड्रॉमध्ये गाडी मिळाल्याचे सांगत पावणे तीन लाखांचा गंडा

Abhijeet Shinde

शिराळा येथे ‘भूईकोट किल्ल्यावर छ. संभाजी महाराजांचे स्मारक होणार’

Abhijeet Shinde

सांगली : खरसुंडी सिध्दनाथ मंदिर उघडण्यासाठी भाजपच्यावतीने घंटानाद

Abhijeet Shinde

सांगली : ‘भारती’मध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लँट : डॉ. विश्वजीत कदम

Abhijeet Shinde

वाहनावरील ताबा सुटल्याने अपघातात चालक जागीच ठार

Sumit Tambekar
error: Content is protected !!