Tarun Bharat

सांगली : सासपडे खून प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोनाची बाधा

प्रतिनिधी / कडेगाव

सासपडे खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात संशयित आरोपींचे काल शनिवारी (ता.1) सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी एका तीस वर्षीय संशयित आरोपीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर सहा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

दरम्यान, सासपडे येथील संशयित कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रांताधिकारी गणेश मरकड,तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर यांनी सासपडे येथे कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे.तर कोरोना बाधीत रुग्णाच्या घरातील दहा लोकांना होम क्वारंनटाईन केले आहे.तर आरोग्य विभागाने गावात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे.
याचबरोबर कडेगाव पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून या तीस वर्षीय आरोपीच्या संपर्कातील 10 व्यक्तीना आरोग्य विभागाने होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.तर कडेगाव पोलीस ठाण्यातील प्रमुख तीन अधिकारी यांची आरोग्य विभागाकडून आरोग्य तपासणी केली जात आहे.तर संबंधित कोरोनाबाधीत संशयितास पुढील उपचारासाठी चिंचणी (ता.कडेगाव) येथे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु केले आहेत.याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

Sangli : महापालिकेकडून सुंदरनगरमधील वारांगणांची आरोग्य तपासणी ; 100 महिलांनी घेतला सहभाग

Abhijeet Khandekar

‘संभाजीराजे पटवता न येणारा माणूस’

Archana Banage

गड किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत संभाजीराजे भूमिका मांडणार

Archana Banage

सांगली : हमालीचे पैसे न दिल्याच्या कारणातून ट्रकचालकास बेदम मारहाण

Archana Banage

गुटखा जोमात गाव कोमात

Archana Banage

”फोन टॅपिंगचा अहवाल नवाब मलिकांनी फोडला”

Archana Banage