Tarun Bharat

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून तिघा दुचाकी चोरट्यांना अटक

प्रतिनिधी/सांगली

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तिघा दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अमित दिपक मोहिते (वय-19 रा. ग्रामपंचायत जवळ करगणी, ता.आटपाडी), लक्ष्मण शहाजी चव्हाण (२१ रा.नंदीवाली वस्ती बनपूरी रोड, करगणी ता.आटपाडी), विजय सुखदेव निळे (२२ रा. करगणी ता.आटपाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून 14 मोटर सायकली असा 6 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड याचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अंच्युत सुयवंशी, सतिश आलदर, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिगरे, सतोष गळवे, मच्छिंद्र बर्डे, जितेद्र जाधव, संदीप गुरव, मुदस्सरपाथरवट, सोहेल कार्तीयानी, शशिकांत जाधव, बजंरग शिरतोडे यांनी पार पाडली.

Related Stories

सातारा : कास पठार वरील शिवकालीन राजमार्ग खुला करण्यास वनसमितीचा विरोध

Archana Banage

सांगली : कृष्णाकाठावरच्या १६ गावांत यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव नाही

Archana Banage

मिरजेत घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास

Archana Banage

केंद्राकडून महाराष्ट्राबाबत दुजाभाव : मंत्री सामंत

Archana Banage

सांगली एसटी विभागातील ८८ बसेस इतर डेपोत रवाना

Archana Banage

सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९९.९४ टक्के

Archana Banage