Tarun Bharat

सांगेतून सुभाष फळदेसाईंना निवडून द्या : फडणवीस

Advertisements

प्रतिनिधी /सांगे

प्रमोद सावंत सरकारने सातत्याने प्रयत्न करून खाण विषयावर मार्ग काढला आहे. खाण महामंडळ व डंप पॉलिसी तयार केली असून येत्या सहा महिन्यांत गोव्यात पुन्हा खाण व्यवसाय सुरू होणार आहे. त्यासाठी गोव्यात पुन्हा भाजपाचे सरकार, तर सांगे मतदारसंघात भाजप उमेदवार सुभाष फळदेसाई यांना निवडून द्या, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नेत्रावळी येथे भाजपाने आयोजित केलेल्या सभेत बोलताना केले.

यावेळी व्यासपीठावर भाजप उमेदवार फळदेसाई, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, सुभाष वेळीप, शशिकांत गावकर, मंडळ अध्यक्ष बायो भंडारी, जुजिनो डिकॉस्ता, सूर्या नाईक, संजय रायकर व इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 2012 ते 17 पर्यंत फळदेसाई यांनी मतदारांची सेवा केली. पण नंतर निवडून आलेल्या आमदाराने जनतेकडे साफ दुर्लक्ष केले. आता पुन्हा सुभाष फळदेसाई या सेवकाला निवडून देण्याची वेळ मतदारांवर आली आहे.

भाजप उमेदवार फळदेसाई म्हणाले की, माझ्या कारर्किदीत मी एक हजार कोटींची विकासकामे केली. पण नंतर या मतदारसंघाचा विकास खुंटला. हा मतदारसंघ पाच वर्षे मागे राहिला. भाजप सत्तेवर आल्यानंतर सरकार नवनव्या योजना आणणार आहे. गोव्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

एमआरएफ कंपनीने कोरोना निगा केंद्र सुरु करावे

Patil_p

रेव्होल्यूशनरी गोवन्सचे शशीराज नाईक शिरोडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sumit Tambekar

इंग्लंडात नोकरी देतो सांगून फसवणूक

Amit Kulkarni

महिला काँग्रेसकडून मडगावात वाढीव वीजबिलांचा निषेध

Patil_p

फातोडर्य़ात आज एटीकेएमबीची लढत केरळ ब्लास्टर्सशी

Patil_p

परतीच्या पावसाने जनजीवन विस्कळीत

Patil_p
error: Content is protected !!