Tarun Bharat

सांगेली प्राथमिक उपकेंद्राला रुग्णवाहिका सुपूर्त

सावंतवाडी / प्रतिनिधी:

सागेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्यात आली आहे. जिप अध्यक्ष संजना सावंत यांनी या रुग्णवाहिकेची चावी माजी पंचायत समितीचे सभापती रवींद्र माडगावकर यांच्याकडे सुपूर्त केली यावेळी माजी जिप सभापती पल्लवी राऊळ. डॉक्टर आदी उपस्थित होते. या प्राथमिक उपकेंद्रातील जवळपास दहा गावांना रुग्णांची ने-आण करणे आधी सुविधा नव्हत्या यासाठी या जि प मतदारसंघातील व पंचायत समिती मतदारसंघातील जनतेच्या हितासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी श्री माडगावकर व राऊळ यांनी केली होती.त्यानुसार रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे ही रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्त करण्यात आली आहे असे श्री मडगावकर यांनी स्पष्ट केले.

Related Stories

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आरवली वेतोबाच्या भेटीला

Anuja Kudatarkar

चिपळुणात चिखल, कचऱयाचे ढीग रस्तोरस्ती

Patil_p

कोरोनामुळे जिल्ह्य़ात साधेपणाने ईद साजरी

Patil_p

शासनाने रेशन दुकानदारांना पीपीई किटसह साहित्य द्यावे!

NIKHIL_N

रत्नागिरीत व्यापाऱयांवर जीवघेणा हल्ला

Patil_p

रत्नागिरी : पूर ओसरला तरीही धोका कायम

Archana Banage