Tarun Bharat

सांगे, केपे, मुरगावात भाजप : मडगावात युती

Advertisements

पाचपैकी तीन पालिकांवर भाजपचे निर्विवाद विजय : मडगावात काँग्रेस- गोवा फॉरवॉर्ड युती,म्हापशात दोन्ही गटात बरोबरी

प्रतिनिधी / पणजी

राज्यातील 5 नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून सांगे, केपे व मुरगाव या पालिकांमध्ये भाजप पुरस्कृत उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. मडगावात मात्र गोवा फॉरवर्ड-काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी भाजपला रोखून आपले वर्चस्व सिद्ध करीत विजय मिळवला आहे. तेथे भाजपचे पालिका मंडळ होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. म्हापसा पालिकेत भाजप पुरस्कृत व विरोधी गट यांची 9-9 अशी बरोबरी झाली असून सत्तेची चावी तेथील दोन अपक्ष विजयी उमेदवारांच्या हाती गेली आहे.

म्हापसा पालिकेत म्हापशेकराचो एकवट व म्हापसा डेव्हलपमेंट प्रंट या दोन गटात चुरशीची लढाई जुंपली आणि दोन्ही गटांचे समान म्हणजे 9 उमेदवार विजयी ठरले आहेत. तेथील स्थानिक भाजप आमदार जोशुआ डिसोझा यांच्या गटाला विरोधी नेते सुधीर कांदोळकर यांच्या गटाने बराच घाम काढल्याचे दिसून आले आहे. एकूण 20 वॉर्ड असलेल्या म्हापसा पालिकेत 2 जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्याने ते ज्या गटाला पाठिंबा देतील तो गट पालिका मंडळाची स्थापना करणार आहे, दोन्ही अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करीत आहेत.

मुरगाव, सांगे, केपेत भाजपची एकहाती सत्ता

मुरगाव, केपे, सांगे या तिन्ही पालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. केपे पालिकेत भाजप पुरस्कृत 9 उमेदवारांनी विजय मिळवून स्थानिक नेते भाजपचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. तेथे 3 काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांचा विजय झाला तर 1 अपक्ष उमेदवार विजयी ठरला.

सांगेत सुभाष फळदेसाइ यांनी मारली बाजी

सांगे पालिकेत माजी भाजप आमदार सुभाष फळदेसाई यांनी बाजी मारत आपल्या गटाचे 9 उमेदवार विजयी करून भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली आहे तर स्थानिक आमदार प्रसाद गावकर यांचे 2 उमेदवाराच विजयी ठरले. तेथे भाजपचे पालिका मंडळ होणार आहे.

मुरगावात भाजपला 21 जणांचे घवघवीत यश्

मुरगाव पालिकेतही भाजप पुरस्कृत 17 उमेदवारांनी विजय संपादन करून विरोधकांचे पानिपत केले आहे. मुरगाव वॉरियर्स संकल्प आमोणकर पुरस्कृत गटाचे 2, दाजी साळकर गटाचे 2 विजयी झाले. 2 अपक्ष विजयी झाले असून तेही भाजपचेच कार्यकर्ते आहेत.

मडगावात काँग्रेस-फॉरवॉर्डची बाजी

मडगाव पालिका निवडणुकीत मात्र भाजपची हार झाली असून तेथे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व गोवा फॉरवर्ड नेते विजय सरदेसाई यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यास भाजपला अपयश आले आहे. त्यामुळे तेथे कामत-सरदेसाई यांच्या गटाचे पालिका मंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगे, पेपे, मुरगावात पालिका राजकारणात भाजपची सत्ता येणार असल्याचे समोर आले आहे.

निवडणूक आचारसंहिता मागे

राज्यातील पाच पालिका निवडणुकीसाठी 30 मार्च 2021 पासून गोवा राज्य निवडणूक आयोगाने लागू केलेली आचारसंहिता मागे घेण्यात आली आहे. तसा आदेश आयोगातर्फे जारी करण्यात आला आहे. म्हापसा, मडगांव, मुरगांव, सांगे, केपे या 5 पालिकांच्या निवडणुकीसाठी ही आचारसंहिता लावण्यात आली होती. ती आता काढून टाकण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त रमणमूर्ती यांच्या सहीने तो आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्य आता पालिका निवडणूक आचारसंहितेमधून मुक्त झाले आहे.

Related Stories

भाजप सरकारने भूमिपुत्र विधेयक अद्याप रद्द केले नाही : खा. सार्दिन

Amit Kulkarni

कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 96.52 टक्के

Amit Kulkarni

दिगंबर कामतने जनतेसाठी किती योजना राबविल्या त्या सांगाव्यात

Amit Kulkarni

आजपासून तीन दिवस पावसाची शक्यता

Patil_p

पेडणे तालुक्यात झाडांची पडझड

Patil_p

मुख्यमंत्र्यांकडून मागील अर्थसंकल्पाची कॉपी

Amit Kulkarni
error: Content is protected !!