Tarun Bharat

सांगे तालुक्यातील सात पंचायतींसाठी 84.86 टक्के मतदान

Advertisements

सर्वत्र चुरशीच्या लढतींचे संकेत, एकूण 20916 मतदारांनी बजावला हक्क, सर्वाधिक 89.79 टक्के मतदान भाटी ग्रामपंचायतीत

प्रतिनिधी /सांगे

सांगे तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणूकीत 84.86 टक्के मतदान झाले आहे. एकूण 24649 मतदारांपैकी 20916 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वत्र चुरसपूर्ण आणि रंगतदार लढती पाहावयास मिळाल्या आहेत. सुरुवातीपासूनच मतदारांत उत्साह दिसून आला. पावसाने देखील मतदानावर कृपा केली आणि एकदम पाऊस लागून राहिला नाही. सर्वत्र शांततेत मतदान झाले. निवडणूक योग्यरीत्या व शांततेत पार पडण्यासाठी सांगेचे मामलेदार आणि निर्वाचन अधिकारी राजेश साखळकर, पोलीस निरीक्षक विनायक पाटील कार्यरत होते.

सर्वाधिक मतदान 89.79 टक्के भाटी ग्रामपंचायतीत झाले असून त्याखालोखाल 88.14 टक्के मतदान नेत्रावळी ग्रामपंचायतीत झाले आहे. भाटी ग्रामपंचायतीमधील सात वॉर्डांसाठी 2287 मतदारांनी मतदान केले. काले ग्रामपंचायतीमधील सहा वॉर्डांसाठी एकूण 84.90 टक्के मतदान होऊन 2378 मतदारांनी हक्क बजावला. वाडे कुर्डी पंचायतीमधील सात वॉर्डांसाठी एकूण 84.97 टक्के मतदान झाले असून 2279 मतदारांनी हक्क बजावला आहे. नेत्रावळी पंचायतीमधील सात वॉर्डांसाठी एकूण 2594 मतदारांनी हक्क बजावला.

रिवण पंचायतीमधील आठ वॉर्डांसाठी एकूण 82.43 टक्के मतदान झाले असून 3157 मतदारांनी हक्क बजावला आहे, तर सावर्डे पंचायतीमधील नऊ वॉर्डांसाठी एकूण 84.38 टक्के मतदान झाले असून 4991 मतदारांनी मतदान केले आहे. उगे पंचायतीमधील सात वॉर्डांसाठी एकूण 82.17 टक्के मतदान झाले असून 3230 मतदारांनी हक्क बजावला आहे. एकूण मतदानामध्ये 9876 पुरुष, तर 11040 महिला मिळून 20916 मतदारांचा समावेश आहे.

लोकांचे लक्ष लागून राहिलेल्या लढती

भाटी पंचायत क्षेत्रातील वॉर्ड 3 मधून माजी सरपंच व दीर्घकाळ पंच राहिलेले उदय नाईक आणि वॉर्ड 2 मधून रिंगणात उभे असलेले माजी सरपंच आणि बराच काळ पंच राहिलेले मनोज पर्येंकर यांचे राजकीय भविष्य सील झाले असून लोकांच्या नजरा या निकालांकडे लागून आहेत. या पंचायतीत अनेक वर्षांपासून उदय नाईक यांचा दबदबा कायम आहे. तो कायम राहतो की, वेगळे घडते हे पाहावे लागेल.

सावर्डे पंचायतीचे माजी सरपंच संदीप पाऊसकर यांचा वॉर्ड राखीव झाल्याने वॉर्ड 6 मधून त्यांच्या पत्नी सिद्धी प्रभू पाऊसकर यांनी निवडणूक लढविली आहे. त्यांच्यासाठी तसेच मीराबाग येथून संजय नाईक, रिवण पंचायतीमधील वॉर्ड 4 मधून निवडणूक लढविलेले माजी सरपंच सूर्या नाईक, माजी उपसरपंच वैशाली नाईक, उगे ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात असलेल्या माजी सरपंच उदय देसाई यांच्या पत्नी उत्कर्षा देसाई, भारती नाईक, माया जांगली, दिव्या नाईक यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. काले पंचायतीच्या वॉर्ड 4 मध्ये माजी सरपंच किशोर गावस देसाई, नेत्रावळी  पंचायतीच्या वॉर्ड 2 मध्ये गत विधानसभा निवडणुकीत तृणमूलच्या उमेदवार राहिलेल्या राखी नाईक, नेत्रावळी ग्रामपंचायतीच्या वॉर्ड 7 मध्ये गत विधानसभा निवडणुकीत आपचे उमेदवार राहिलेले माजी उपसरपंच अभिजित देसाई आणि एकूण चार वेळा पंच राहिलेले शशिकांत गावकर, माजी सरपंच रजनी गावकर यांचाही प्रमुख उमेदवारांत समावेश होतो.

मंत्री फळदेसाई यांची भूमिका महत्त्वाची

एकूण चित्र पाहता आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची सांगेतील पंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहील असे दिसते. सांगे मतदारसंघातील पाचही पंचायतांवर आपले समर्थक उमेदवार निवडून येण्यासाठी फळदेसाई यांनी कंबर कसलेली आहे. यापूर्वीच त्यांच्या समर्थक सुमित्रा नाईक या रिवण ग्रामपंचायतीमधील वॉर्ड 2 मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. सांगेतील पाचही पंचायतींवर भाजप समर्थक मंडळे निवडून येतील, असा विश्वास मंत्री फळदेसाई यांनी व्यक्त केलेला आहे.

या निवडणुकीत सुभाष फळदेसाई यांनी भाजप समर्थक उमेदवारांसाठी घरोघरी प्रचार केलेला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असून सांगेचा आमदार भाजपचा आहे. त्यामुळे पंचायत निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवारांना निवडून द्या, जेणेकरून विकासकामे राबविण्यास बरे पडेल, असे आवाहन त्यांनी मतदारांना केलेले आहे. माजी आमदार वासुदेव मेंग गावकर तसेच रिवण जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर हे देखील प्रचारात सक्रिय झाले होते.

लोकांना बदल हवा असून नव्या चेहऱयाना संधी मिळेल अशी चिन्हे दिसून येत आहेत. मंत्री फळदेसाई वगळता माजी आमदार तसेच गत विधानसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवार प्रसाद गावकर आणि अपक्ष उमेदवार सावित्री कवळेकर यांनी उघडपणे निवडणुकीत भाग घेतल्याचे जाणवले नाही. मात्र त्यांच्या प्रचारकार्यात सक्रिय राहिलेले त्यांचे काही समर्थक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुळात कोणत्याही राजकीय पक्षाने अधिकृतपणे आपली पॅनल जाहीर केले नाही. मात्र उमेदवारावरून त्याची राजकीय पारख केली गेली आहे. भाजपपुरस्कृत बहुतेक उमेदवारांनी मतदारांना वितरित केलेल्या पत्रकावर एका बाजूने उमेदवाराचे, तर दुसऱया बाजूने मंत्री फळदेसाई यांचे छायाचित्र छापलेले होते. त्यामुळे ते भाजप समर्थक उमेदवार आहेत हे लक्षात येत होते.

सांगे तालुक्यातील सात पंचायतींसाठी झालेले मतदान

पंचायतवॉर्डपुरुष मतदारमहिला मतदारएकूण मतदारमतदान टक्केवारी
भाटी710781209228789.79 टक्के
काले611541224237884.9
वाडे कुर्डी710581221227984.97
नेत्रावळी712611333259488.14
रिवण814581699315782.43
सावर्डे923772614499184.38
उगे7149017403230,82.17

Related Stories

कोरोनाचा संसर्ग चार महिन्यात संपेल

Patil_p

ऍड.खलप अमृतमहोत्सवपूर्तीनिमित्त उद्या सत्कार

Amit Kulkarni

आरपीआयचा भाजपला पाठिंबा : रामदास आठवले

Amit Kulkarni

वेतन थकबाकीच्या प्रश्नावर एमपीटीच्या कामगार संघटनेकडून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर

Omkar B

पणजी मधील घोटाळे आणि गुन्हेगारीचे प्रमुख बाबूशच आहेतः

Patil_p

कोरोनामुळे सरकारी शिमगोत्सव रद्द

Amit Kulkarni
error: Content is protected !!