Tarun Bharat

सांडपाणी सोडले चक्क गटारीमध्ये

कपिलेश्वर कॉलनी रोडवरील प्रकार

प्रतिनिधी /बेळगाव

शहर आणि उपनगर परिसरात डेनेज चेंबर तुंबण्याच्या तक्रारी दररोज होत आहेत. पण याची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जात नाही. अलीकडे ड्रेनेज चेंबरचे पाणी गटारीमध्ये सोडण्यात आले असल्याने व्यावसायिक व रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. मनपा अधिकाऱयांच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एसपीएम रोड ते जुना धारवाड रोडला जोडणाऱया कपिलेश्वर कॉलनी परिसरात रस्त्यावर खोदाई सत्रामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिसरात ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी आतापर्यत चार वेळा खोदाई करण्यात आली असल्याने व्यवसायिक, रहिवासी आणि वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता ड्रेनेज तुंबण्याची समस्या निर्माण झाल्याने व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.

एसपीएम रोडवरील महात्मा गांधी उद्यानाच्या प्रवेशव्दाराशेजारी डेनेज चेंबर तुंबले आहे. याची दुरुस्ती करण्याऐवजी चक्क सांडपाणी गटारीमध्ये सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रहिवाशांना वास्तव्य करणे मुश्किल बनले आहे. गेल्या कित्येक दिवसापासून गटारीमधून सांडपाणी सोडण्यात आले असून याबाबत मनपा अधिकाऱयांकडे अनेकवेळा तक्रार केली. नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत असताना अशा समस्यांकडे मनपा प्रशासनाच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले असून आजाराचे शिकार झाल्यानंतर स्वच्छतेचे काम हाती घेणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या समस्येची पाहणी करून आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.

Related Stories

लैंगिक अत्याचार करणाऱयांना कठोर शिक्षा करा

Amit Kulkarni

पहिल्या टप्प्यात 264 मतदान केंद्रे संवेदनशील

Patil_p

सिलिंडर वाहतूक करणाऱया ट्रकची अडवणूक

Amit Kulkarni

वेणुग्राम सायकल क्लबची सायकल फेरी

Amit Kulkarni

डॉ. आंबेडकर यांचा अवमान करणाऱया वाहिनीवर कारवाई करा

Amit Kulkarni

पुनीत राजकुमारच्या चाहत्याने केली आत्महत्या; स्टारच्या मृत्यूमुळे बसला होता धक्का

Archana Banage