Tarun Bharat

सांताक्रूझ येथे गोळी लागून युवकाचा मृत्यू

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

सांताक्रूझ येथे एका गँगकडून दुसऱया गँगच्या प्रमुखाची हत्या करण्याच्या प्रयत्नात हत्या करण्यासाठी गेलेल्याच गँगमधील एका युवकाला गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या प्रकारामुळे सांताक्रूझ परिसरात पुन्हा गँगवॉर डोके वर काढीत असल्याचे दिसून येत आहे.

दहाजणांची टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत युवकाचे नाव सोनू यादव (वय 25, करंझाळे) असे आहे. कुविख्यात गुंड इम्रान बेपारी याची हत्या करण्यासाठी सुमारे 10 जणांची टोळी त्याच्या घराकडे शुक्रवारी पहाटे दाखल झाली होती. इम्रान बेपारी याचा खंडणी वसूल करणे यासारख्या अनेक गुन्हेगारी प्रकरणात हात आहे. बेपारीचा खात्मा करण्यासाठी त्याच्या घराजवळ दाखल झालेली दहाजणांची टोळी सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याने या प्रकरणाचा तपास लवकरच लागणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

कुविख्यात इम्रान बेपारी याला मारण्यासाठी दाखल झालेल्या गँगने बेपारी याच्या घरावर तसेच त्याच्या गाडीवर गोळ्या झाडल्या होत्या. याचवेळी हत्या करण्यासाठी आलेल्या टोळीतील सोनू यादव यालाच गोळी लागली होती. तशाच स्थितीत त्याला परत घेऊन जाण्याचा संशयितांनी प्रयत्न केला होता. वाटेतच त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याला त्याच स्थितीत सोडून संशयितांनी पोबारा केला. सोनू यादव याचा मृतदेह सांताक्रूझ सीमेवर मिळाला आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ठ प्रसन्नू, पणजी उपविभागीय अधिकारी उत्तम राऊत देसाई, पणजी निरीक्षक सुदेश नाईक, ओल्ड गोवा निरीक्षक कृष्णा सिनारी तसेच इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर वेगाने तपासकामाला सुरुवात झाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

नऊजणांना अटक

दरम्यान, रात्री उशिरा ओल्ड गोवा पोलिसांनी याप्रकरणी नऊजणांना अटक केली असून यात दोघा अल्पवयींनांचा समावेश आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे : मर्सिलिनो डायस ( वय 35, कुडका बांबोळी), रॉनी डिसोझा (वय 23, सांतईनेज), सॅम्युयल डिसोझा (वय 20, सांतईनेज), डेविड आराझो (वय 26, सांताक्रूझ), मिंगल आराझो (वय 19, सांताक्रूझ), फ्रान्सिस पॅन्की नादाल (वय 23, सांताक्रूझ), डेविड डिसोझा (वय 20, कामराभाट).

Related Stories

काणकोणात लॉकडाऊन दुसऱया दिवशीही यशस्वी

Patil_p

विजय हजारे स्पर्धेत आज गोव्याची सलामी बडोद्याशी

Amit Kulkarni

मोफत वीज आश्वासनाला 2.93 लाख कुटुंबांची मान्यता

Patil_p

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शची दुसऱया दिवशीही आघाडी

Amit Kulkarni

… अन्यथा कला अकादमी प्रकरणी आंदोलन

Amit Kulkarni

भाजपच्या विकास तीर्थ रॅलीला चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!