Tarun Bharat

सांबरा एटीएसमधील 150 प्रशिक्षणार्थींना कोरोना

शनिवारी जिल्हय़ात 510 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 9 जण दगावले

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच आहे. शनिवारी दिवसभरात 510 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये सांबरा येथील एअरफोर्स प्रशिक्षण केंद्रात नव्याने दाखल झालेल्या 150 हून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शनिवारी कोरोनामुळे 9 जण दगावले आहेत.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणासाठी अलिकडेच सांबरा एटीएसमध्ये दाखल झालेल्या 150 हून अधिक जणांचे अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आले आहे. यापुढे आठवडय़ातून एकदा या जवानांची तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.

24 तासांत जिल्हय़ातील 331 जण कोरोनामुक्त

शनिवारी बेळगाव तालुक्मयातील 261 जणांना कोरोनाची लागण झाली असून ग्रामीण भागात 167, शहर व उपनगरांतील 94 रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या 24 तासांत जिल्हय़ातील 331 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. बरे होणाऱयांचे प्रमाण वाढले आहे.

बेळगाव शहर व तालुक्मयातील 5, संकेश्वर येथील 2, गोकाक तालुक्मयातील 2 असे एकूण 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कडोली, पटगुंदी, संकेश्वर, हिडकल परिसरातील कोरोनाबाधितांचा यामध्ये समावेश आहे. सरकारी अहवालात मात्र शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

कंग्राळी के. एच., बडस, हुदली, मुचंडी, के. के. कोप्प, हिंडलगा, कुदेमनी, गणेशपूर, हलगा, बस्तवाड, काकती, कणबर्गी, कंग्राळी बी.के., भाग्यनगर, बॉक्साईट रोड, हनुमाननगर, आदर्शनगर-वडगाव, दत्त गल्ली-वडगाव, सारथीनगर, शाहूनगर, श्रीनगर, रामतीर्थनगर, विद्यानगर, मजगाव, राणी चन्नम्मानगर, वैभवनगर, सह्याद्रीनगर, मारुतीनगर, विनायकनगर, अनगोळ, न्यू गुड्सशेड रोड परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

किणये, कुलकर्णी गल्ली, गवळी गल्ली, सदाशिवनगर, बसवाण गल्ली-शहापूर, जुने बेळगाव, कुवेंपूनगर, हिंडाल्को कॉलनी, संभाजीनगर-वडगाव, महात्मा फुले रोड, विजयनगर, गोजगा, जुने गांधीनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आयटीबीपीच्या तीन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

10 हजार जणांनी केली कोरोनावर मात

शनिवारी एकूण बाधितांचा आकडा 14 हजार 250 वर पोहोचला आहे. यापैकी 10 हजार 145 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली असून सध्या 3 हजार 887 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आणखी 1 हजार 352 जणांचे अहवाल यायचे आहेत. 5 खासगी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

Related Stories

सहनशक्तीचा कडेलोट; नगरसेवकांनी केला निषेध

Patil_p

पिरनवाडी येथे सव्वातीन लाखांची घरफोडी

Amit Kulkarni

चिपळूण शहरासह तालुक्यात कडकडीत बंद!

Patil_p

येळ्ळूर येथील रोहयोंतर्गत कामाची पाहणी

Amit Kulkarni

कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचारी संघटनेला साकडे

Amit Kulkarni

मच्छे येथील 220 केव्ही स्टेशनसाठी लवकरच निविदा

Amit Kulkarni