Tarun Bharat

सांबरा एटीएसमधील 22 जण कोरोना पॉझिटिव्ह

सोमवारी 112 नवे रुग्ण, वृद्धेचा मृत्यू

प्रतिनिधी / बेळगाव

सांबरा एटीएसमधील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. तर रविवारी कोरोनामुळे एका 75 वषीय वृद्धेचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासात 112 नवे रुग्ण आढळून आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोरोना थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाय योजना हाती घेतली आहे.

जवान व त्यांच्या कुटुंबांतील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 6 ते 12 वषीय मुलांचाही समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 28 हजार 962 इतकी झाली असून सक्रिय रुग्ण संख्या 985 वर पोहोचली आहे. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 53 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

अद्याप 35 हजार 829 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. तर 2 हजार 496 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहे. आतापर्यंत 6 लाख 34 हजार 58 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 5 लाख 99 हजार 271 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर मृतांचा आकडा 355 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 27 हजार 594 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सोमवारी काकती, पिरनवाडी, गणेशपूर, शहापूर, आदर्शनगर-वडगाव, अंजनेयनगर, आझादनगर, भाग्यनगर, बसव कॉलनी, कॅम्प, चव्हाट गल्ली, जुने बेळगाव, गुरूप्रसाद कॉलनी, कामत गल्ली, टिळकवाडी, राणी चन्नम्मानगर, सदाशिवनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, सुभाषनगर, विरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या बरोबरच रेल्वे विभागातील दोघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सोमवारी बेळगाव शहर व उपनगरांतील 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबरोबरच अथणी, बेळवडी, चमकेरी, चिकोडी, घटप्रभा, अर्टाळ, भुजनाळ, संकेश्वर, हळ्ळूर, हत्तरगी, जनवाड, कंकणवाडी, खनगाव, खानापूर, नागनूर, मदिहळ्ळी, एम. के.हुबळी, उखार खुर्द, रामदुर्ग, तेलसंग येथेही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जिह्यात दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

एज्युकेशन इंडियातर्फे शैक्षणिक धोरणावर कार्यक्रम

Amit Kulkarni

कर्नाटक: एप्रिल-जूनमध्ये मद्य विक्रीत ३३ टक्के घट

Archana Banage

कर्नाटक : साखर कारखान्यांची केंद्राला कर्जाबाबतचे नियम शिथिल करण्याची विनंती

Abhijeet Khandekar

डोंगरगावचा संपर्क रस्ता त्वरित करा

Amit Kulkarni

ग्राहक आयुक्त खंडपीठासाठी लवकरच निधी मंजूर करू

Patil_p

झाडशहापूरनजीक अपघात, गोकाकचे दोन तरुण ठार

Omkar B
error: Content is protected !!