Tarun Bharat

सांबरा रोडवर दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक

Advertisements

चाकु, काठी, मिरची पावडर जप्त, दोघे फरारी

प्रतिनिधी / बेळगाव

सांबरा रोडवर दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या एका त्रिकुटाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री हि कारवाई करण्यात आली असून पोलिसांना पाहताच दोघे जण तेथून फरारी झाले आहेत. अमाननगरहून न्यू गांधीनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर पाच जणांची एक टोळी तरुणीच्या तयारीत होती.

शुक्रवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर दगड ठेवून हि टोळी दरोडय़ासाठी दबा धरुन बसली होती. यासंबंधीची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर व त्यांच्या सहकार्‍यांनी अचानक छापा टाकला.

पोलिसांना पाहताच घटनास्थळावरुन दोघे जण फरारी झाले. इम्रान अब्दुलखादर नदाफ (वय 21, रा. न्यूगांधीनगर), जाफर महम्मद कुरे (वय 25, रा. शेट्टी गल्ली), फैजान सलीम शेख (वय 27, रा. कोतवाल गल्ली), अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटांची नावे आहेत.

पोलिसांनी मिरची पावडर, दगड, चाकू, रॉड जप्त केले आहेत. रस्त्यावर दगड ठेवून हि पाच जणांची टोळी अंधारात दबा धरुन बसते. एखादा वाहन चालक रस्त्यावरील दगड पाहून आपल्या वाहनाचा वेग कमी केला तर त्याच्या डोळय़ात मिरची पूड टाकून त्यांना लुटण्याचा डाव असतो. मात्र दरोडा टाकण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

सांगा वाहने लावायची तरी कुठे?

Amit Kulkarni

हनुमाननगर-टी.व्ही. सेंटर येथे कचऱयाचे ढीग

Amit Kulkarni

दगडफेकीच्या घटनेने तणाव

Omkar B

पत्रकाराच्या कुटुंबीयांना पालकमंत्र्यांकडून आर्थिक मदत

Omkar B

स्त्रीला लढण्याची विद्या देणाऱया विद्याताई

Patil_p

आनंदनगर-वडगाव येथील दोघे जण बेपत्ता

Rohan_P
error: Content is protected !!