Tarun Bharat

सांबा : लष्कराच्या छावणीजवळ 4 संशयित ड्रोनचा वावर

Advertisements

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. सीमेवर घुसखोरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तानने आता गेल्या काही महिन्यांत ड्रोन कारवाया वाढवल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा जम्मूमधील सांबा येथे लष्कराच्या छावणीजवळ पुन्हा चार ठिकाणी संशयित ड्रोनचा वावर आढळून आला. सांबाचे एसएसपी राजेश शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

रविवारी रात्री उशिरा सांबाच्या बारी ब्रह्मना भागातील लष्कराच्या छावणीजवळ चार ठिकाणी संशयित ड्रोन दिसले. सांबामध्ये ड्रोन दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शनिवारीही सांबामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित ड्रोन दिसले होते. त्यामुळे सीमाभागात सध्या सुरक्षा दल सतर्क आहेत.

Related Stories

हैदराबादमध्ये DRDO ने सुरू केली मोबाईल टेस्टिंग लॅब

prashant_c

सोलापुरात आज 28 कोरोनाग्रस्तांची भर, 6 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम यशस्वी

Patil_p

“…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!”

Abhijeet Shinde

काँगेसचे प्रभावशाली नेते आर. पी. एन. सिंग भाजपमध्ये

Patil_p

सोरडी जि. प. शाळेच्या छताचे प्लॅस्टर कोसळले , एक विद्यार्थी किरकोळ जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!