Tarun Bharat

साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन

प्रतिनिधी /बेळगाव

साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित पहिली साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धा मंगळवार दि. 22 फेब्रुवारीपासून व्हॅक्सिन डेपो मैदानावर प्रारंभ होत आहे.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेत एकूण 40 वॉर्डाच्या संघांनी भाग घेतला आहे. या 40 संघाना 4 गटात विभागण्यात आले आहे.  अ गटात अनगोळ स्ट्रायकर्स वॉर्ड 52, एन. जी. स्पोर्ट्स वॉर्ड 27, काव्या स्पोर्ट्स वॉर्ड 3, मिलिंद स्पोर्ट्स वॉर्ड 34, गोल्डन स्पोर्ट्स वॉर्ड 8, श्री साई स्पोर्ट्स वॉर्ड 22, लास्ट माईल स्पोर्ट्स वॉर्ड 44, श्री स्पोर्ट्स वॉर्ड 5, साईराज स्पोर्ट्स वॉर्ड 15, नरवीर स्पोर्ट्स वॉर्ड 50.

ब गटात मराठा स्पोर्ट्स वॉर्ड 29, बी. के. स्पोर्ट्स वॉर्ड 48, विरोट स्पोर्ट्स वॉर्ड 10, क्रिकेट फास्ट वॉर्ड 30, एवायसी वॉर्ड 25, शितल रामशेट्टी वॉर्ड 58, सेव्हन स्टार, गोगो स्पोर्ट्स वॉर्ड 9, सीटीएम स्पोर्ट्स वॉर्ड 8, एपीएस वॉरियर्स वॉर्ड 30.

क गटात क्रिकेट लव्हर्स वॉर्ड 4, शिवाजी कॉलनी वॉर्ड 30, सिद्धकला एस. व्ही. रोड वॉर्ड 43, शिवशक्ती स्पोर्ट्स वॉर्ड 52, भगवा रक्षक वॉर्ड 3, रॉयल्स स्ट्रायकर्स वॉर्ड 6, मदर इंडिया वॉर्ड 18, मोरया स्पोर्ट्स वॉर्ड 34, मिस्टर फार्मर बीसीसी वॉर्ड 30, अलरझा वॉर्ड 1.

ड गटात सिद्धकला अनगोळ वॉर्ड 57, केजीबी स्पोर्ट्स वॉर्ड 7, नरवीर स्पोर्ट्स वॉर्ड 41, एआरबी स्पोर्ट्स वॉर्ड 2, क्रिकेट मास्टर 24, साईराज वॉर्ड 44, मिनरा स्पोर्ट्स वॉर्ड 14, शहापूर स्पोर्ट्स वॉर्ड 23, एस. आर. स्पोर्ट्स वॉर्ड 54, विरार सिक्स्टीन स्पोर्ट्स वॉर्ड 16 असे गट करण्यात आले आहेत.

मंगळवारी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे नारायण फगरे, पुरस्कर्ते महेश फगरे क्रीडाईचे अध्यक्ष क्ही. एस. हिरेमठ, ए. बी. शिंत्रे, भरत देशपांडे, हर्षद कलघटगी, विजय पाटील, चैतन्य कुलकर्णी, युवराज हुलजी, प्रशांत वांडकर, विमल भंडारी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4.30 वा. व्हॅक्सिनडेपो मैदानावर स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे. बुधवार दि. 23 पासून सामन्यांना प्रारंभ होणार होईल, असे स्पर्धा सचिव आनंद चव्हाण यांनी कळविले आहे.

Related Stories

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p

सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी विशेष प्रयत्न करू

Amit Kulkarni

संत गाडगेबाबा भवन येथे विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni

शुक्रवारी शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

Amit Kulkarni

एसकेई सोसायटीच्या सांस्कृतिक अकादमीचे उद्घाटन

Amit Kulkarni

हायटेकबरोबरच हायस्पीड वेश्याव्यवसाय

Amit Kulkarni