Tarun Bharat

साईराज बहुतुले बीकेसी इनडोअर अकादमी संचालक

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

भारताचा माजी फिरकी गोलंदाज साईराज बहुतुलेची मुंबई क्रिकेट संघटनेच्या बीकेसी इनडोअर अकादमीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत साईराज बहुतुलेची इनडोअर अकादमी संचालकपदी नियुक्ती करण्याच्या निर्णयाला अधिकृत मान्यता दिली. साईराज बहुतुलेला या जबाबदारीसाठी मुंबई क्रिकेट संघटनेकडून वार्षिक 30 लाख रूपयांचे मानधन दिले जाणार आहे.

मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी यापूर्वी साईराज बहुतुलेची नियुक्ती करण्यात आली होती. आता या पदासाठी अमोल मुझुमदारची नियुक्ती करण्यात आली आहे. 48 वर्षीय साईराज बहुतुलेने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 188 प्रथमश्रेणी सामन्यात 630 बळी मिळविले. चार वर्षापूर्वी साईराज बहुतुलेकडून विदर्भ, केरळ आणि बंगाल संघांना मार्गदर्शन मिळाले होते. क्रिकेटच्या गेल्या दोन हंगामात साईराज बहुतुलेकडे गुजरातच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

मुंबईच्या वरिष्ठ क्रिकेट संघाकरिता तंदुरूस्ती शिबीर लवकरच घेतले जाणार आहे. या शिबिरात सुमारे 45 खेळाडू सहभागी होणार आहेत. घनसोली येथील रिलायन्स स्टेडियममध्ये मुंबई संघाकरिता तंदुरूस्ती सराव शिबीर घेतले जाणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई निवड समिती सदस्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णयही मुंबई क्रिकेट संघटनेने घेतला. आता या निवड समितीतील प्रत्येक सदस्यांला वार्षिक 9 लाख रूपये तर प्रमुख निवड सदस्य सलील अंकोला याला 10 लाख रूपये मानधन मिळणार आहे.

Related Stories

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी बाबर आझम, फक्र झमान यांची शिफारस

Amit Kulkarni

यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल : रोहित

Patil_p

इटालियन स्पर्धेतून ओसाकाची माघार

Patil_p

‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलचे 61 धावात 7 बळी

Patil_p

धोनीचा संताप …अन् पंचांनी चक्क ‘तो’ निर्णयच बदलला!

Omkar B

ऍग्युरो बार्सिलोनाशी करारबद्ध

Amit Kulkarni
error: Content is protected !!