Tarun Bharat

साई स्पोर्ट्स, झेवर गॅलरी डायमंड संघ विजयी

के. आर. शेट्टी चषक स्मृती टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

के.आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित दुसऱया के.आर. शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साई स्पोर्ट्स संघाने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 5 गडय़ांनी तर झेवर गॅलरी डायमंड संघाने मार्ग रायजिंग स्टारचा केवळ 3 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुशांत कोवाडकर (साई स्पोर्ट्स), रोहित देसाई (रायजिंग स्टार) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर संघाने 20 षटकात 9 बाद 132 धावा केल्या. विजय पाटीलने 5 चौकारासह 40, सुनील सक्रीने 25, संतोष चव्हाणने 12 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे सुशांत कोवाडकरने 16 धावात 5 तर राजेंद दंगण्णावरने 15 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स संघाने 17.1 षटकात 5 बाद 133 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. पार्थ पाटील व यश कळसण्णावर यांनी 4 चौकारासह प्रत्येकी 37 धावा, पुनित दिक्षितने 5 चौकारासह 26, विनोद देवाडीगाने 13 धावा केल्या. विश्रुततर्फे विनित आडुरकरने 24 धावात 2, विजय पाटीलने 30 धावात 2 तर आकाश कटांबळेने 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात झेवर गॅलरी डायमंडने 20 षटकात 6 बाद 182 धावा केल्या. कर्णधार माजिद मकानदारने 4 षटकार 2 चौकारासह 27 चेंडूत 47, चेतन पांगिरेने 1 षटकार 6 चौकारासह 44, अमेय भातकांडेने 4 चौकारासह 28, साकीब सराफने 16 धावा केल्या. मार्ग रायजिंग स्टारतर्फे रोहित देसाई व किरण तारळेकर यांनी प्रत्येकी 25 धावात 2 तर ऋतुराज भाटे 44 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मार्ग रायजिंग स्टारने 20 षटकात 8 बाद 179 धावाच केल्याने त्यांना केवळ 3 धावानी हा सामना गमवावा लागला. रोहित देसाईने 2 षटकार 9 चौकारासह 41 चेंडूत 67, विठ्ठल हबिबने 2 षटकार 1 चौकारासह 26 धावा केल्या. झेवर गॅलरीतर्फे आनंद कुंभारने 23 धावात 2, रोहित पाटीलने 29 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे रमेश गोदवाणी, उदय मोटार, चंदन चौगुले, केतन चौगुले यांच्या हस्ते सामनावीर सुशांत कोवाडकर, इम्पॅक्ट खेळाडू पार्थ पाटील, सर्वाधिक षटकार विनित आडुरकर, उत्कृष्ट झेल आकाश कटांबळे तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे भास्कर पाटील, केदारनाथ चौगुले, सुमित पाटील, अनुराग अनगोळकर यांच्या हस्ते सामनावीर रोहित देसाई, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार माजिद मकानदार, उत्कृष्ट झेल आकाश पत्तार यांना चषक देवून गौरविण्यात आले.

गुरुवारचे सामने

  • के.आर. शेट्टी किंग्स वि. बीसीसी मच्छे सकाळी 9.30 वाजता
  • मार्ग रायजिंग स्टार वि. साई स्पोर्ट्स दुपारी 1.30 वाजता.

Related Stories

मत्स्यपालकांना मिळणार कर्ज

Amit Kulkarni

ध. संभाजी चौकातील बसथांब्यावर तिसऱयांदा खोदाई

Amit Kulkarni

मराठी वृत्तपत्रातूनही नोटीस देणे गरजेचे

Amit Kulkarni

पवनने मारले आनंदवाडीचे कुस्ती मैदान

Amit Kulkarni

आरक्षणामुळे निवडणुकीस विलंब झाल्याची तक्रार

Amit Kulkarni

आंबेवाडी-किरावळे रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!