Tarun Bharat

साके येथे वैरणीसह छकडा विहिरीत कोसळला; बैलाचा मृत्यू

Advertisements

व्हनाळी / वार्ताहर

साके तालुका कागल येथे भैरवनाथ देवालय रोड वरील शामराव पाटील यांच्या रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत वैरणीसह एक्का ( छकडा) सुमारे पंचवीस फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडल्यामुळे बैलाचा गुदमरून पाण्यात मृत्यू झाला. सुदैवानं यामध्ये शेतकरी जयवंत पाटील व रोहन हे दोघे बचावले.

याबाबत अधिक माहिती अशी साके येथील ढवण यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. नेहमीप्रमाणे जयवंत पाटील हे जनावरांना वैरणीसाठी ऊसतोड करण्यासाठी गेले. यावेळी त्यांचा मित्र सत्यम पाटील हे देखील वैरणीसाठी ऊस तोडण्यासाठी आला होता. यावेळी जयवंत पाटील यांनी सत्यम यांचा एक्का आपल्या स्वतःचा बैल आणून घरी वैरण सोडण्यासाठी जात असताना शामराव पाटील यांच्या विहिरीजवळ बैल घाबरल्याने वैरणीने भरलेला छकडा बैलासह सुमारे 25 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला यामध्ये बैलाचा गुदमरून पाण्यात मृत्यू झाला तर सुदैवाने जयवंत व रोहन या दोघांचा यामध्ये जीव बचावला यामध्ये या शेतकऱ्याचे सुमारे लाख रुपये नुकसान झाले.

Related Stories

कोल्हापूर : ‘महाराष्ट्र बंद’ यशस्वी

Abhijeet Shinde

परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालक सुसंवाद गरजेचा…

Abhijeet Khandekar

KDC ELECTION : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर विरुद्ध गणपतराव पाटील यांच्यात होणार लढत

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाची चिंता नको… संस्था सभासदांची दिवाळी गोडच

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ‘डॉक्टर कोविड’ सेंटरचा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा – राज्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

पाचगावचे ग्रामसेवक स्वॅब द्या सांगून दमले….

Abhijeet Shinde
error: Content is protected !!