Tarun Bharat

साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट दरीत कोसळली

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

साखरपुड्यासाठी निघालेली बस 50 प्रवाशांसह 100 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंध्रप्रदेशच्या चित्तूरमध्ये शनिवारी रात्री घडली. या अपघातात 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 45 प्रवाशी जखमी झाली आहेत. जखमींना तिरूपतीच्या रुया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथून एक खासगी बस शनिवारी रात्री तिरुपतीला साखरपुड्यासाठी निघाली होती. बसमध्ये 50 लोक होते. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर बाकरपेट येथे एका वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस 100 फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, स्थानिक लोकांनी तात्काळ अपघातग्रस्तांना वाचवण्यासाठी धाव घेत चंद्रगिरी पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. 9 रुग्णवाहिका, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाचे एक विशेष पथक घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतलं. अंधार आणि घनदाट जंगलामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. अथक प्रयत्नानंतर सात प्रवाशांचे मृतदेह आणि 45 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींना रुया सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Stories

संजय राऊत कार्टुन शेअर करत म्हणतात पत्रकार ‘फ्रन्ट लाईन वर्करच’

Abhijeet Shinde

क्वारेंटाईन सेंटरमध्ये बिअरची मागणी

Patil_p

तबलिगी जमातीचे प्रमुख मौलाना साद यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल

prashant_c

फेसबुकच्या शेअर्सची घसरण, मार्क झुकरबर्गला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका!

Abhijeet Shinde

फेब्रुवारीमध्ये 3 राफेल विमानं भारतात दाखल होणार

datta jadhav

लॉकडाऊननंतर ‘कोरोना’साठीकोणते धोरण राबविणार

Patil_p
error: Content is protected !!