Tarun Bharat

साखरप्यात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

Advertisements

वार्ताहर/  ताम्हाने

साखरपा येथील अनेक वर्षे भोजनाची यशस्वी कारकीर्द असलेल्या माने बंधूच्या हॉटेल एव्हरेस्ट येथे राज्य शासनाच्या शिवभोजन थाळी योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. याप्रसंगी लांजा-राजापूर-साखरपाचे आमदार राजन साळवी उपस्थित होते.

त्याच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजपकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, काका कोलते, मुग्धा जागुष्टे, विजय पाटोळे, शेखर आकटे, मंगेश दळवी, राजा वाघधरे, बापू शिंदे, जनक जागुष्टे, विनायक गोवरे, बाळकृष्ण सकपाळ आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

परिसरातील अनेक गरजूंना या महाविकास आघाडीच्या शिवभोजन योजनेचा लाभ होईल असे आ. राजन साळवी यांनी सांगितले. ही योजना दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत कार्यरत राहणार आहे. याचा फायदा अनेक लाभार्थीना होणार आहे. कोरोना काळात या थाळीचा दर 5 रुपये असणार आहे. यामध्ये भाजी, चपाती, वरण-भात याचा समावेश असणार आहे. ही योजना साखरपा परिसरात येण्यासाठी पंचायत समिती सदस्य जया माने यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच आमदार राजन साळवी यांनी महत्वाचे योगदान दिले.

Related Stories

लंडनमधील ‘कोरोना लढाई’त सिंधुकन्या ‘टीम लिडर’

NIKHIL_N

वादळात कोसळलेले झाड पुन्हा झाले उभे!

Patil_p

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशावतारी कंपनींसाठीचे अनुदान मंजूर करा

Ganeshprasad Gogate

सव्वाशे वर्षाची “अभिषेकची” परंपरा जोपासणारे डेगवे, आंबेखणवाडीतील ग्रामस्थ..!

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाचे 35 नवे रूग्ण

Patil_p

आरोग्य विभागाच्या भरतीसंदर्भात ‘बनावट’ वेबसाईट

Patil_p
error: Content is protected !!