Tarun Bharat

साखर उद्योगावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

ऑनलाईन टीम / पुणे :

वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ुटच्या वतीने येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 या कालावधीत दुसऱया आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शाश्वतपणा : साखर तत्संबंधित उद्योगात वैविध्यपणा आणि नाविन्यपूर्णता’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या परिषदेचे होणार असून, परिषदेच्या तांत्रिक सत्रामध्ये नामवंत विशेषज्ञांची एकूण 68 व्याख्याने 13 वेगवेगळय़ा सत्रांमध्ये होणार आहेत. या परिषदेला देशातून तसेच परेशातून साधारण 2000 उद्योजक, नामवंत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.

पोस्टर सत्रात साखर उद्योगासंबंधित तंत्रज्ञानाविषयीचे देशभरातील एकूण 165 संशोधन लेखांचे सादरीकरण होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेस इंग्लड, फिलीपाइन्स, थायलंड, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, स्पेन, स्विझर्लंड, आयर्लंड, जपान, दक्षिण अफ्रिका, अमेरिका, बेल्झियम, इजिप्त, चीन, सुदान, स्विडन, इंडोनेशिया, इस्राईल, फिजी अशा 21 देशांतील तज्ञांची उपस्थिती राहणार आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनामध्ये साखर उद्योगातील अभियांत्रिकी, प्रक्रिया व शेतकऱयांसंबंधित आवजारे, बि-बियाणे इ. मशिनरी उत्पादक, कृषी निविदा आणि अवजारे उत्पादक, साखर कारखाने यांनी 225 स्टॉल्सची उभारणी केली आहे. प्रदर्शन व ऊस प्रात्यक्षिके पाहण्यासाठी शेतकरी, उद्योजक, अभियांत्रिकी व शेती महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना विनामूल्य प्रवेश असणार आहे.

Related Stories

सोलापूर : बुधवारी माघ द्वादशीलाही विठ्ठलाचे देऊळबंद

Archana Banage

बोंडले येथील तरुण उजनी कालव्याच्या पाण्यात बेपत्ता

Archana Banage

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न ; शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी विठुरायाला घातले साकडे

Archana Banage

सोलापूर : टँकर आणि पिकअप समोरासमोर धडक ; दोनजण गंभीर जखमी

Archana Banage

स्वामी सेवा समजूनच नागरिकांची कामे करू : वळसे-पाटील

Archana Banage

पंढरपूर कार्तिकीचा जनावर बाजार रद्द

Archana Banage