Tarun Bharat

साखर कारखानदारांविरोधात केल्या तक्रारी

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत शेतकऱयांकडून तक्रारींचा वर्षाव : जिल्हाधिकाऱयांनी कारवाईबाबतचे दिले आश्वासन

प्रतिनिधी /बेळगाव

थकीत ऊस बिल आणि ऊस दराबाबत शेतकऱयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला जिह्यातील साखर कारखान्यांचे मुख्य व्यवस्थापक उपस्थित नसल्याने शेतकऱयांनी प्रारंभीच तक्रार केली. या बैठकीला मुख्य व्यवस्थापकांनी येणे गरजेचे असताना एखाद्या कर्मचाऱयाला पाठवून जिल्हा प्रशासनाचा आणि आमचा अवमान केला आहे. ही बैठक रद्द करावी, अशी मागणी केली. मात्र जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शेतकऱयांची समजूत काढुन तुमचे प्रश्न मांडा, आम्ही त्याचा पाठपुरावा करू, असे सांगितले.

ज्या साखर कारखान्यांचे मुख्य व्यवस्थापक आले नाहीत त्या साखर कारखान्यांना नोटीस बजावू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले आहे. ऊसतोड आणि वाहतुकीचा खर्च शेतकऱयांकडून वसूल केला जात आहे, हे चुकीचे आहे. साखर कारखानदार मालक शेतकऱयांची लूट करत असल्याचा आरोप केला आहे. काही साखर कारखान्यांकडून शेतकऱयांनी आगाऊ रक्कम घेतली. त्याचे धनादेश बॉन्स करून शेतकऱयांवर गुन्हे नोंदविले आहेत, हे चुकीचे असून संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी शेतकऱयांनी
केली.

ऊसतोड झाल्यानंतर 14 दिवसांमध्ये साखर कारखान्यांनी शेतकऱयांची ऊसबिले द्यावीत, ज्या साखर कारखान्यांनी ऊसबिले दिली नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. याचबरोबर त्यांच्याकडून बिले वसूल करताना 15 टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी, असा आग्रह शेतकऱयांनी धरला. केंद्र सरकारने एफआरपी जाहीर केली आहे. त्यानुसार सर्व साखर कारखान्यांनी दर द्यावा, जे साखर कारखानदार एफआरीपपेक्षा दर कमी देतात त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली.

काही साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रकार सुरू आहेत. तेंव्हा त्याचा तपास करणे गरजेचे आहे. जे काटामारी करतात त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून ते कारखाने कायमस्वरुपी बंद करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. एकूणच शेतकऱयांनी साखर कारखानदारांच्या विरोधात या बैठकीत जोरदार आवाज उठविला. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत संबंधित साखर कारखानदारांना योग्य ती सूचना करू, असे आश्वासन दिले आहे.

या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे जिल्हा उपसंचालक चन्नबसाप्पा कोडली, शेतकरी चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, राघवेंद्र नाईक, रवी सिद्दमण्णावर, सिद्धगौडा मोदगी, जोशी यांच्यासह इतर शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Stories

फेसबुक प्रेंड्स सर्कलतर्फे जीवनावश्यक साहित्याची मदत

Omkar B

आविष्कार उत्सवाला लक्षणिय प्रतिसाद

Patil_p

काकामुळे पुतण्याला कोरोनाची लागण

Patil_p

दीप अमावास्येनिमित्त बाजारपेठेत गर्दी

Amit Kulkarni

बाची येथे गांजा विकणाऱ्या तरुणाला अटक

Patil_p

ज्युनियर मि.बेळगाव, मोरया श्री, मोरया क्लासिक शरीरसौष्टव स्पर्धा शनिवारी

Amit Kulkarni