Tarun Bharat

‘साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी प्रश्नी साखर आयुक्तांना घेराव घालणार’

माजी खासदार राजू शेट्टी यांची कराडमध्ये माहिती

प्रतिनिधी / कराड

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफ आर पी रक्कम अद्याप दिली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र येथे आल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वतः शासकीय विश्रामगृहावर येऊन यांच्याशी चर्चा केली. एफआरपी बाबत 1 तारखेला पुण्यात साखर आयुक्तांकडून आरआरसी बाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. दरम्यान, शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम पूर्णपणे दिली नसल्याने राजू शेट्टी यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र गुरुवारी सह्याद्रीची वार्षिक सभा असल्याने शेट्टी यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अचानक येथे दाखल झाले या आंदोलनाची कल्पना पोलिसांना लागल्याने त्यांनी शेट्टी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर दुपारी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वतः शासकीय विश्रामगृहावर राजू शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली.

सरकारकडून होत असल्याच्या कार्यवाहीची माहिती देत या प्रश्नावर एक तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयात आपण सर्व कारखान्यांचा आढावा घेणार आहोत. त्यानंतर आरआरसी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राजू शेट्टी यांनी, शासनाने कारवाई न केल्यास पाच तारखेला पुण्यात साखर आयुक्तालयास घेराव घालून जाब विचारणार असल्याचे सांगितले. या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Related Stories

…तोपर्यंत उसाचे कांडे तोडू देणार नाही

datta jadhav

बारावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचीच बाजी; आपल्या जिल्ह्याचा निकाल पहा एका क्लिकवर

Archana Banage

जिल्ह्यात 1875 नवे रुग्ण वाढले

datta jadhav

मुकेश अंबानी झाले आजोबा; आकाश-श्लोका यांना पुत्ररत्न

Tousif Mujawar

साताऱ्यात RT-PCR चे बनावट रिपोर्ट

datta jadhav

अटल पेन्शन योजनेच्या प्रसारासाठी सातारची सर्वोत्कृष्ठ कामगिरी,

Patil_p