Tarun Bharat

साखळीत बुधवारी आढळले 17 कोरोना रूग्ण.

डिचोली तालुक्मयातील सक्रिय रूग्णांची संख्या 67. साखळीतील सक्रिय सकारात्मक रूग्णसंख्या 62 वर.

डिचोली / प्रतिनिधी

  साखळी शहरात सध्या कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली असल्याने सध्या साखळीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. बुध. दि. 22 जुलै रोजी एकाच दिवसात साखळीत 17 कोरोना सकारात्मक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे साखळीतील सकारात्मक सक्रिय रूग्णांची संख्या 62 इतकी झाली आहे. तर संपूर्ण डिचोली तालुक्मयातील सक्रिय सकारात्मक रूग्णांची संख्या 67 झाली आहे.

   साखळी मतदारसंघ सध्या कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून या मतदारसंघात कोरोनाचे रूग्ण वाढतच आहेत. डिचोली तालुक्मयातील सर्वात प्रथम कोरोनाचा रूग्ण साखळीत आढळून आला होता. त्यानंतर साखळीतील कोरोना रूग्णांची संख्या वाढतच गेली. ती संख्या आजही वाढतच आहे. त्यामुळे साखळी शहर परिसर व ग्रामीण भागातीलही वातावरण भितीदायक बनले आहे. साखळी सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या पथकातर्फे दररोज मोठय़ा संख्येने लोकांच्या स्वेब टेस्ट सुरूच आहेत.

 बुधवारी साखळीत 17 रूग्ण सकारात्मक

साखळीतील विर्डी, गोकुळवाडी, देसाईनगर, भंडारवाडा, मुजावरवाडा, सुंदरपेठ, बाजार परिसर, गावठण, हाऊसिंग बोर्ड, रूदेश्वर कॉलनी तसेच कारापूर तिस्क, लालबाग या भागात आतापर्यंत रूग्ण आढळून आले आहेत. सध्या या विविध भागांमधील अनेक रूग्ण हे तंदुरुस्त होऊन परतले आहेत. तर सध्या विर्डी गावात कोरोनाने थैमान घातले आहे. विर्डी गावात काल बुधवारी 4 सकारात्मक रूग्ण आढळून आले आहेत. हरवळे भागात एकदम 6 रूग्ण आढळून आले आहेत. देसाईनगर येथे 4 रूग्ण सकारात्मक सापडले आहेत. गोकुळवाडी येथे 2 रूग्ण सापडले आहेत. व अन्य एक रूग्ण साखळीत आढळला आहे. त्यामुळे साखळीत बुध. दि. 22 रोजी एकदमच 17 सकारात्मक रूग्णांची नोंद झाली आहे. एकूण सकारात्मक सक्रिय रूग्णांची संख्या 62 झाली आहे. तर बुधवारी साखळी आरोग्य केंद्रातर्फे 227  लोकांच्या स्वेब टेस्ट घेण्यात आल्या आहेत.

डिचोली पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचाऱयांच्या स्वेब टेस्ट. डिचोली पोलीस स्थानकाच्या पिसीआरवर व्हेनवरील एक पोलीस कर्मचारी मंगळवारी कोरोना सकारात्मक आल्यानंतर डिचोली पोलीस स्थानकातील त्याच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱयांची स्वेब टेस्ट घेण्यात आली. सदर सकारात्मक आढळून आलेला पोलीस कर्मचारी हा थिवी कोलवाळ येथील असून तो गेल्या गुरू. दि. 16 जुलै पासून तो राहत असलेल्या भागात कोरोना रूग्ण आढळल्याने कामावर आला नव्हता. नंतर त्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे डिचोली पोलीस स्थानकातील सदर पोलीस कर्मचाऱयाच्या संपर्कात आलेल्या पोलीसांची स्वेब टेस्ट पोलीस स्थानकातच घेण्यात आली. त्याच दरम्यान पोलीस स्थानकात स्वेब चाचणीसाठी आलेल्या डिचोली औद्योगिक वसाहतीतील एक दोन अस्थापनातील कामगारांच्या स्वेब टेस्ट पोलीस उपअधीक्षकांच्या सुचनेनुसार औद्योगिक वसाहतीत घेण्यात आल्या.

Related Stories

प्रभाग 22 मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दामोदर नाईक यांचा दावा

Amit Kulkarni

वेगवेगळय़ा तीन अपघातात 4 युवक ठार

Amit Kulkarni

पेडणे येथे अपघातात नईबाग येथील वृद्धाचा मृत्यू

Patil_p

कुंभारजवेत यंदा मडकईकर घरणेशाही संपणार

Amit Kulkarni

संस्कारक्षम शिक्षणातून माणूस घडतो

Amit Kulkarni

गोव्याच्या सीमा खुल्या पण महाराष्ट्राच्या सीमा बंदच

Archana Banage