Tarun Bharat

साखळी बॉम्बस्फोटात काबूलमध्ये 9 ठार

20 हून अधिक जण जखमी : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

काबूल / वृत्तसंस्था

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत.  काबूलमधील विविध भागात पाच बॉम्बस्फोट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानातील अंतर्गत कामकाजमंत्री मसूद अंदाराबी यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानात ‘आयएस’शी संबंधित दहशतवाद्यांकडून हल्ले करण्यात येत आहेत.

अफगाणिस्तानात हिंसाचाराचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा दलाने परिसराला घेराव घातला असून नाकाबंदी करण्यात आली आहे. परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच सुरक्षा दलाने परिसरात शोधमोहीमही हाती घेतली. गेल्या मंगळवारी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट आणि गोळीबारात उपप्रांतीय गव्हर्नरसह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी काबूलमध्ये 12 डिसेंबरला झालेल्या रॉकेट हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. तर एकजण जखमी झाला होता.

अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबान आणि सरकारमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी काही ठोस उपाययोजनांसाठी आणि सामजस्यांबाबत चर्चा सुरू असतानाच हिंसाचाराच्या सत्राला सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांचे हल्ले रोखण्याचे महत्त्वाचे आव्हान सुरक्षा दलासमोर आहे.

Related Stories

नवीन नकाशाबाबत नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आज मतदान

datta jadhav

पाकिस्तान जगासाठी धोकादायक, बहिष्कार टाकावा

Patil_p

मुस्लीम देशांचा पाकिस्तानला झटका

Patil_p

भुतानमधील सकतेंग अभयारण्यावर चीनचा दावा

datta jadhav

विमान लॅंडिंगला परवानगी नाकारल्याने अशरफ गनी पोहचले ओमानमध्ये

Archana Banage

रशियात कोरोनाबाधितांनी गाठला 10 लाखाचा टप्पा

datta jadhav