Tarun Bharat

सागरिका म्युझिककडून नव्या रूपात श्रावणमासी हर्षमानसी

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांची श्रावणमासी हर्षमानसी ही निसर्ग कविता सगळय़ांनीच लहानपणापासून ऐकली आहे. मात्र आता सागरिका म्युझिकने ही कविता नव्या रुपात, नव्या चालीत सादर केली आहे. गायक स्वप्नील बांदोडकरने नव्या रुपातलं श्रावणमासी हर्षमानसी हे गाणे गायलं आहे. नुकताच ह्या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.

सागरिका म्युझिकने स्वप्नील बांदोडकरचा ती हा नवा अल्बम सादर केला आहे. या अल्बममधील कसा चंद्र आणि सौरी ही गाणी यापूर्वीच लोकप्रिय झाली असून, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर 5 लाखाहून जास्त हिट्स मिळाले आहेत. नव्या रुपातल्या श्रावणमासीला निलेश मोहरीरनं संगीत दिलं आहे, तर कलांगणच्या बालकलाकारांनी कोरस दिला आहे. श्रावण महिन्यातील ऊन- पावसाच्या खेळाचं आणि निसर्गाचं अचूक वर्णन करणारी श्रावणमासी ही कविता आबालवफद्धांच्या अगदी ओठावर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मात्र, नीलेश मोहरीरचं फ्रेश संगीत आणि स्वप्नील बांदोडकरचा अप्रतिम आवाज यांच्या मिलाफातून नवं श्रावणमासी साकारलं आहे. या अप्रतिम गाण्याला देखण्या निसर्गाचीही जोड मिळाली आहे.

स्वप्नील बांदोडकर आणि सागरिका यांचं जुनं आहे. स्वप्नीलनं सागरिकाबरोबर केलेला ती हा पाचवा अल्बम असून याआधी बेधूंद, तू माझा किनारा, तुला पाहिले हे हिट अल्बम स्वप्नील आणि सागरिका यांनी रसिकांना दिले आहेत. त्यातील राधा ही बावरी, गालावर खळी, राधा राधा, मंद मंद अशी गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यामुळेच आता नव्या रुपातलं श्रावणमासी हर्षमानसी हे गाणंही रसिकांच्या पसंतीला उतरत आहे.

Related Stories

तापसीचा ‘हसीन दिलरुबा’ नेटफ्लिक्सवर

Amit Kulkarni

नोरा फतेही इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर्स

Patil_p

किचनपासून मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास

Patil_p

‘गुड लक जेरी’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p

अमिषा पटेल विरोधात वॉरंट

Patil_p

अभिनेता गौरव 30 ऑगस्टपर्यत एनसीबीच्या कोठडीत

Tousif Mujawar