Tarun Bharat

सागरी सुरक्षेच्या त्रिपक्षीय चर्चेसाठी अजित डोवाल श्रीलंकेत

ऑनलाईन टीम / कोलंबो

भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील सागरी सुरक्षेबाबत त्रिपक्षीय चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आज कोलंबोत दाखल झाले आहेत. श्रीलंकेत आज आणि उद्या (दि.28) भारत आणि मालदीवच्या सागरी सुरक्षा सहकार्याबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चौथी त्रिपक्षीय बैठक होत आहे. 

तिन्ही देशातील सागरी सुरक्षेबाबतची ही बैठक सहा वर्षानंतर होत आहे. या बैठकीत भारताचे अजित डोवाल आणि मालदीवच्या संरक्षणमंत्री मारिया दीदी या आपल्या देशांचे नेतृत्व करणार आहेत. बांग्लादेश, मॉरिशस आणि सेशेल्सचे निरीक्षकही यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

हिंदी महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबत समन्वयाने कारवाई, मदत आणि बचाव कार्याचे प्रशिक्षण, समुद्रातील वाढते प्रदूषण, माहितीची देवाणघेवाण, अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी यांसारख्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होईल.

Related Stories

एप्रिलपासून वीज दरवाढीचा शॉक?

Patil_p

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar

जयपूरच्या ज्वेलरी ग्रूपवर छापा, कोटय़वधींचा काळा पैसा उघड

Patil_p

पंजाबमध्ये 2,817 नवे कोरोना रुग्ण, 62 मृत्यू

Tousif Mujawar

नामांतराचा वाद पेटणार; G-20 परिषदेदरम्यान जलील यांचा आंदोलनाचा इशारा

datta jadhav

पेरूमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 9.8 लाख पार

Tousif Mujawar