Tarun Bharat

सागर शिर्के याला अटक

एकंबे

भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेतील कॅश डिपॉझीट मशीनमध्ये सोमवार दि. 29 मार्च रोजी रात्री 8 वाजता दोन हजार रुपयांच्या 19 बनावट नोटांचा भरणा केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुह्यात पोलिसांनी बोबडेवाडी, ता. कोरेगाव येथील सागर शांताराम शिर्के या युवकास अटक केली. त्याने गुह्याची कबुली दिली असून, नोटा बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बँकेच्या तपासणीमध्ये या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या शाखाधिकार्यांनी ज्या खात्यामध्ये या नोटांचा भरणा झाला, याची माहिती देत फिर्याद दिली होती. गुह्याचे स्वरुप गंभीर असल्याचे  लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील व उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी तपासाविषयी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना सूचना दिल्या.

प्रभाकर मोरे यांनी विनाविलंब उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार केले. त्यांनी बोबडेवाडी येथे जाऊन राहत्या घरातून सागर शिर्के याला अटक केली. त्याने गुह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर शिर्के याला घेऊन पोलीस पथकाने थेट मुंबईतील वरळीकडे धाव घेतली. शिर्के हा तेथे राहत असल्याने त्या घरातून संगणक, प्रिंटर, कागद जप्त करण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व नाईक अमोल सपकाळ तपास करत आहेत.

चौकट ः दोन तासातच गुह्याचा छडा

बँकेने बनावट नोटांबाबत फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व उपनिरीक्षक विशाल कदम यांनी तातडीने तपास हाती घेत सागर शिर्के याला अटक केली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस नाईक अमोल सपकाळ, धनंजय दळवी, अमोल कणसे, सनी आवटे, पूनम वाघ, अविनाश घाडगे यांच्या पथकाने शिर्के याच्याकडून गुन्हा उघडकीस आणला. अवघ्या दोन तासातच पोलिसांनी गुह्याचा छडा लावल्याने वरिष्ठांनी शबासकीची थाप दिली आहे.

Related Stories

लोणंद-फलटण महामार्गावरील भीषण अपघात दोन ठार

Patil_p

संभाजी भिडे यांचे समीर वानखेडेंना समर्थन

Archana Banage

अपहरणातील बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

Patil_p

फडणवीसांवर टीका करताना कॉंग्रेस खासदाराची जीभ घसरली; म्हणाले, मंत्रीमंडळात भ्रष्टाचारी…

Abhijeet Khandekar

अनिल परब यांनी सोमय्यांविरोधात ठोकला 100 कोटींचा दावा

datta jadhav

कोसुंब येथे सापडले दुर्मीळ खवल्या मांजर

Patil_p
error: Content is protected !!