Tarun Bharat

साटरे सत्तरी गावात शिक्षकांनी छप्परावर भरविले ऑफलाईन शिक्षण वर्ग

प्रतिनिधी /वाळपई

 सत्तरी तालुक्मयात मोबाईल नेटवर्क प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आज नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी जवळपास अठरा किलोमीटर अंतरावर जाऊन साटरे या ग्रामीण भागात जावून मुलांची शाळा भरविली. यावेळी मुलांना वेगवेगळय़ा विषयाचे शिक्षण देण्यात आले .यामध्ये जवळपास पंधरा मुले सहभागी झाली होती .शिक्षकांनी अपार कष्ट करून साटरे सारख्या ग्रामीण भागांमध्ये प्रत्यक्षपणे भेट जाऊन सदर ठिकाणी असलेल्या मुलांना ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिक्रिया भागातील ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केलेल्या आहेत.

 याबाबतची माहिती अशी की नगरगाव पंचायत क्षेत्रातील साटरे गावांमध्ये मोबाईलचा नेटवर्क मिळत नाही. यामुळे सदर भागात शिक्षण घेणाऱया मुलांना अनेक स्तरावर त्रास सोसन करावे लागत असतात. यामुळे सरकारने सदर ठिकाणी मोबाईल टॉवरची उभारणी करावी अशा प्रकारची मागणी आठ दिवसापूर्वी जवळपास 30 मुलांनी वाळपईच्या बिएसनल कार्यालयांमध्ये धडक देऊन केली होती. मात्र त्यासंदर्भात अजूनही अजिबात हालचाल झालेली नाही. ऑनलाइन पद्धतीच्या शिक्षणाला मुलांना लाभ घेता येत नाही यामुळे आज नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी साटरे गावांमध्ये जाऊन एका घराच्या छपरावर जवळपास पंधरा मुलांना प्रत्यक्षपणे शिक्षण देण्याचे कार्य केले. याबाबत शिक्षकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नगरगाव पंचायत क्षेत्रातून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. पूर्णपणे घनदाट जंगल व गोवा कर्नाटक यांच्या सीमेवर वसलेल्या या गावांमध्ये मोबाईलचा नेटवर्क उपलब्ध होत नाही. यामुळे याभागात शिक्षण घेणाऱया मुलांना ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणाचा लाभ होत नाही. याची दखल घेत व नगरगाव सरकारी माध्यमिक विद्यालय शिक्षण घेणाऱया मुलांना ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्षपणे शिकवण करण्यास सुरुवात केलेली आहे.

याला मुलांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.त्याचप्रमाणे पालकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिलेले आहे. स्थानिक पंचायत सभासद लक्ष्मण गावस यांनी आपल्या घराचे छप्पर   यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुलांना ऑफलाइन पद्धतीने अभ्यासक्रम शिकवण्यासाठी महत्त्वाची मदत झाल्याचे शिक्षकांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी अशा प्रकारे समर्पित भावनेने ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्षपणे जाऊन मुलांचे ऑफलाइन पद्धतीने वर्ग घेण्यासाठी केलेल्या कामगिरीचे पालकांनी व ग्रामस्थानी स्वागत केले आहे. साटरे  भागांमध्ये मोबाईलचा नेटवर्क उपलब्ध होत नाही यामुळे आठ दिवसापूर्वी या भागातील जवळपास तीस मुलांनी वाळपई बीएसएनएल कार्यालयामध्ये जाऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. देरोडे, कोदाळ, साटरे भागामध्ये मोबाईलचा टॉवर उभारून मोबाईलची नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती केली होती. त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना स्थानिक आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दहा दिवसांमध्ये यातीन्ही गावासाठी जिओ कंपनीचा टा?वर उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आश्वासन दिले होते.

Related Stories

टॅक्सी व्यावसायिकांसाठी महामंडळ

Amit Kulkarni

डॉ. दत्तगुरु आमोणकर यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या क्षेत्रिय संचालकपदी नियुक्ती

Amit Kulkarni

…अन्यथा सरकार ‘त्या’ जमिनी ताब्यात घेणार

Omkar B

एशिया विक्रम केल्याबद्दल आकाश नाईक यांचा गौरव

Amit Kulkarni

गटसमितीच्या निषक्रियतेमुळे वाळपई मतदारसंघात काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था

Amit Kulkarni

रस्त्याची दुरूस्ती दीर्घकाळ टिकणार याची काळजी घ्या – खा. सार्दिन

Amit Kulkarni