Tarun Bharat

साडेतीन वर्षांनी टीम इंडियाने गमावले टेस्ट क्रिकेटमधील अव्वल स्थान

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना व्हायरसमुळे सर्व व्यवहार थप्प आहेत. याचा फटका क्रीडा जगतानाही बसला आहे. आगामी सर्व स्पर्धा रद्द करण्यात आले आहेत. तरी देखील टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण जवळजवळ साडेतीन वर्षांनंतर टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या टेस्ट क्रिकेट क्रमवारीमधील आपले अव्वल स्थान आज गमावले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीकडून आज कसोटी, टी-20 आणि वन-डे क्रिकेट मधील संघाची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार टीम इंडियाने आपले अव्वल स्थान गमावले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाकडून टीम इंडियाला हा धक्का बसला आहे. 

भारतीय संघाने 2016 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. यावर्षी भारताने बारा टेस्ट मॅच जिंकल्या होत्या तर भारताला एका मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. 

आयसीसीने आज क्रमवारी जाहीर करताना 2017 मधील आकडेवारी नुसार ही क्रमवारी ठरवली आहे. यानुसार 2019 नंतर खेळल्या सामनातून 100 टक्के आणि त्यापूर्वीच्या दोन वर्षातील कामगिरीच्या 50 टक्के गुणांची बेरीज करून ही क्रमवारी पुढे आली आहे. 

त्यानुसार टीम इंडियाकडे 114 गुण असून, ऑस्ट्रेलियाने 116 गुण कमवत अव्वल स्थानावर आपले नाव कोरले आहे. तर 115 गुणांनी न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे.  


त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया टी-20 मध्ये ही अव्वल स्थानी आहे. तर वन डे मध्ये इंग्लंड टीम टॉप वर आहे. 

Related Stories

टी-20 मालिकेसाठी भारत-द. आफ्रिका अनुकूल

Patil_p

निपाह व्हायरसने घेतला 12 वर्षीय मुलाचा बळी

datta jadhav

जगभरात 24 तासात वाढले 6.13 लाख रुग्ण

datta jadhav

विंडीजचा न्यूझीलंड दौरा सुरु राहणार : मंडळ

Omkar B

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी लंकन संघात थीक्षणाचा समावेश

Patil_p

हॅलेप, कोको गॉफ दुसऱया फेरीत

Patil_p