Tarun Bharat

साडेपाच लाख लोकांनी घेतला पहिला डोस

जिल्हय़ाला आतापर्यंत 10.60 लाख डोस प्राप्त

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्हय़ात आतापर्यंत एकूण 5 लाख 60 हजार 136 नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. तसेच ज्या लोकांनी लस घेतली नाही, अशांनी लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

जिल्हय़ात कोरोना लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. कोरोनाच्या दोन लाट आल्या. पुन्हा अशी लाट येऊ नये किंवा आलीच तर त्याचा मुकाबला करता यावा, यासाठी सर्वांनी लस घेऊन आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

यामध्ये एकूण 9 हजार 855 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 188 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 991 प्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 8 हजार 929 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 1 लाख 32 हजार 489 व्यक्तींनी पहिला डोस तर 98 हजार 446 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 1 लाख 60 हजार 623 नागरिकांनी पहिला डोस तर 1 लाख 18 हजार 866 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 44 हजार 178 जणांनी पहिला डोस तर 1 लाख 55 हजार 733 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण 9 लाख 50 हजार 298 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 जिल्हय़ाला आजपर्यंत एकूण 10 लाख 60 हजार 500 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 8 लाख 16 हजार 180 लसी या कोविशिल्डच्या तर 2 लाख  44 हजार 320 डोस कोवॅक्सिनच्या आहेत. तर 7 लाख 51 हजार 726   कोविशिल्ड आणि 1 लाख 98 हजार 572 कोवॅक्सिन असे मिळून 9 लाख 50  हजार 298 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्हय़ातील विविध लसीकरण  केंद्रांवर एकूण 1 लाख 38 हजार 190 डोस उपलब्ध आहेत. त्यापैकी 99 हजार 710 कोविशिल्डच्या आणि 38 हजार 480 कोवॅक्सिनचे डोस आहेत. जिल्हय़ात सध्या 20 हजार 600 डोस शिल्लक असून त्यापैकी 7 हजार 400 कोविशिल्ड आणि 13 हजार 200 कोवॅक्सिनचे आहेत.

Related Stories

जिल्हय़ात एकाच दिवशी 30 जण कोरोनामुक्त

Patil_p

जिल्हय़ातील 115 गावे ‘ओडीएफ प्लस’ जाहीर

NIKHIL_N

नऊ लाखांहून अधिक दंड वसूल

NIKHIL_N

शिक्षक वाङ्ममय चर्चा मंडळाच्या कार्याची राज्यस्तरावर दखल

Anuja Kudatarkar

नाचणेत घराला आग, अडीच लाखाचे नुकसान

Patil_p

मालवण-कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांना प्राईम अँग्रीकल्चर अवॉर्ड प्रदान

Anuja Kudatarkar