Tarun Bharat

साडे पाच हजार खेळाडूंनी कबड्डीसाठी ठोकला ‘शड्डू’

कोल्हापूर / संग्राम काटकर

महाराष्ट्रात दबदबा असलेल्या कोल्हापूर जिह्याच्या कबड्डीला पूर्वीपेक्षा अधिक चांगली शिस्त लागावी यासाठी जिल्हा कबड्डी असोसिएशनने हाती घेतलेल्या संघ व खेळाडू नोंदणीला अपेक्षेपेक्षाही जादा प्रतिसाद मिळाला आहे. गेली तीन महिने सुरु राहिलेल्या या नोंदणी कार्यक्रमात तब्बल 95 संघ व 5 हजार 640 खेळाडूंनी नोंदणी केल्याने असोसिएशनची विश्वासार्हता पूर्वीपेक्षाही अधिक बळकट झाली आहे. असोसिएशनकडे केलेली ही नोंदणी 1 वर्षांसाठी असणार आहे. परंतू नोंदणीनंतरच्या पुढील वर्षही नेंदणीकृत संघातूनच संबंधित खेळाडूला स्पर्धेत खेळावे लागणार आहे. जो खेळाडू ज्या संघाकडून नोंदणीकृत झाला आहे, त्याला राज्यातील अन्य संघातून खेळता येणार नाही. मात्र आाŸफरनुसार व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत खेळण्याची मुभा खेळाडूंना असणार आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियममधील गाळ्यातील असोसिएशनच्या कार्यालयात कोषाध्यक्ष अण्णासाहेब गावडे यांनी एकहाती कबड्डी संघ व खेळाडू नोंदणी कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारुन ती नेटाने पूर्णत्वाला नेली. देशातील जिल्हा पातळीवरील खेळाडू प्रत्येक सिझनमध्ये वेगवेगळ्या संघातून स्पर्धेत खेळत असल्याने कबड्डीला बेशिस्तीचे वळण लागत असल्याच्या तक्रारी ऍमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाकडे होत होत्या. तीन वर्षांपूर्वी त्याची दखल घेऊन फेडरेशनने देशातील जिल्हा कबड्डी संघटनांना संघ व खेळाडूंची नोंदणी करुन घेण्याचे आवाहन केले. तसेच एका संघातून नोंदणी केलेल्या खेळाडूला सिझनमध्ये अन्य कोणत्याही संघातून खेळण्यास मनाई करण्याचे फर्मानही काढले. त्यानुसार 2019 पासून कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने संघ व खेळाडू नेंदणी कार्यक्रमाला सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या नोंदणी कार्यक्रमाला जिह्यातील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच असोसिएशनकडे 97 संघ व या संघांमधून 5 हजार 640 खेळाडूंची नोंदणी झाली आहे.

नेंदणी कार्यक्रमातही फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक संघातील खेळाडूंचे जिल्हा असोसिएशनकडून आधारकार्डची झेरॉक्सप्रत घेण्यात आली आहे. शिवाय संघ नोंदणीसाठी प्रत्येकी 2000 रुपये तर संघांमधील खेळाडूंच्या नोंदणीसाठी प्रत्येकी 25 रुपये शुल्क घेतले आहे. या नोंदणीचे वैशिष्ठ्य़ म्हणजे प्रत्येक संघातून 35 ते 45 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. नोंदणीनंतर त्यांना असोसिएशनने ओळखपत्रही दिले आहे. शिवाय ज्या खेळाडूने ज्या संघातून नोंदणी केली आहे, त्याची सर्व माहिती संगणकीकृतही केली आहे. तसेच नोंदणी केलेल्या प्रत्येक खेळाडूला पुढील सिझनमधील स्पर्धांमध्ये नोंदणीकृत संघातूनच खेळण्याचे बंधन घातले आहे. या बंधनामुळे एका सिझनमधील विविध स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या संघातून खेळण्याला चाप बसला आहे.

ऍमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केल्यानुसार नोंदणीकृत संघातून दोन वर्षे कबड्डी स्पर्धा खेळणे बंधनकारक आहे. दोन वर्षानंतरच्या कबड्डी सिझनसाठी जर एखाद्या खेळाडूला अन्य संघातून खेळण्याचे झाल्यास सर्वप्रथम आपल्या मूळच्या संघाचे नाहरकत पत्र हे घेणे बंधनकारक असेल. तसेच नोंदणी कार्यक्रमावेळी जे खेळाडू नाहरकत पत्र जिल्हा कबड्डी असोसिएशकडे देतील, त्यांनाच अन्य संघातून नोंदणी करण्यास अनुमती दिली जाईल.

Related Stories

साताऱ्यात भरदिवसा गोळीबार, एकजण ठार

Archana Banage

खोची- दुधगाव बंधारा पाण्याखाली; वारणेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर

Abhijeet Khandekar

शिरोळ येथे हल्ला करून फरारी तिघा संशयितांना घेतले ताब्यात

Archana Banage

कोल्हापूर : कुंभोज परिसरात संचारबंदीचे पालन करत नवरात्रोत्सवाला सुरुवात

Archana Banage

‘भविष्यात सत्तेत राहायची इच्छा नाही, कारण…’; मोदींनी केली ‘मन की बात’

Archana Banage

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून कालकुंद्री भागात अफवा

Archana Banage
error: Content is protected !!