Tarun Bharat

साडय़ांचे मनमोहक प्रदर्शन ‘इप्रेशन्झ’

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावच्या चोखंदळ महिलांसाठी दि. 29 आणि 30 सप्टेंबर रोजी हॉटेल युके-27 येथे ‘इप्रेशन्झ’ हे विविध साडय़ांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10.30 ते रात्री 8.30 यावेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

कोरोनाने आपल्या जीवनात अनेक बदल घडविले. परंतु आपण नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे. जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा इंदधनुष्य आणि जेंव्हा अंधार पडतो तेंव्हा तारे शोधले पाहिजेत. म्हणजेच नकारात्मकतेवर नाकारुन सकारात्मक वाटचाल केली पाहिजे. हळुहळु विविध कार्यक्रम सुरू होत आहेत. हे प्रदर्शनसुध्दा त्याचाच एक भाग आहे.

या प्रदर्शनात उत्कृष्ट प्रतिच्या सुतापासून रेशमापर्यंत अहमदाबादमधील साडय़ा आहेत. तसेच श्रीदासाडी, कांजीवरम, बनारस, मुंगा बनारस, कोटा, रेशीम, लाईटवेट रेशीम, टसरसील्क, ऑरगेंझा, ऍन्टीकझारी, ऑरगेंझा तुसार, कलमकारी, बनारसी, बनारसी लीनन अशा अनेक साडय़ांच्या नमुन्यांचा समावेश आहे. या शिवाय चंदीगडच्या ज्योतिका विविध दागिनेही प्रदर्शनात मांडणार आहेत. मोती ते पोलकीपासून तयार केलेले दागिने लक्षवेदी ठरणार आहेत हे नक्की.

या शिवाय तरुणींना आणि महिलांना आकर्षित करतील अशा विविध रेशीम आणि सुती कुर्ती आणि वस्त्र प्रावरणे यांचाही प्रदर्शनात समावेश आहे. लखनवी कुर्ती हे सुध्दा आणखीन एक आकर्षण आहे. महिलांनी या प्रदर्शनाला आवर्जुन भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Stories

योगाचा सराव दररोज अत्यावश्यक

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूक पुन्हा लांबणीवर पडणार?

Patil_p

तलाव ओव्हरफ्लो झाल्याने बाळकृष्ण नगरमधील घरात पाणी

Patil_p

मंगळवारीही बाजार सुरू

Patil_p

आता लाकडी घाण्याकडे वळू लागली पावले

Amit Kulkarni

हलगा जंगलात रानडुकराची शिकार, एकास अटक

Amit Kulkarni